मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 
 
तानाजी शेळगांवकर 

नायगाव : तालुक्यातील कुंटूर येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण अंकुश बाबुराव ढगे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे निराशेतून शेतातील लिंबाच्या बा झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर घटना 18 सप्टेंबर रोज बुधवारी रात्री घडली 
    आंकुश हा सुशिक्षित बेरोजगार असून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता परंतु सरकारच्या मराठा समाजा संदर्भातील उदासीन धोरणामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे तो नेहमी तणावात राहत होता.
      दिनांक 18/9/ 2024 रोजी सायंकाळी ठीक 9.00 वाजताच्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आंकूष नी आपली जीवनयात्रा संपविली.

      आत्महत्या करण्यापूर्वी आपली परिस्थिती खुप हलाखीची असून मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नौकरी लागत नाही त्यामुळे मी स्वतः समाजाला आरक्षण मिळावे म्हणून  आत्महत्या करत आहे अशी चिठी लिहून सदरील तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली आहे..
     आजपर्यंत मराठा आरक्षण मिळावे म्हणून नायगाव तालुक्यातील 9 तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली आहे.
दैनंदिन अशा घटना घडत असताना सुध्दा या  शासनाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळ मिळत नाही.
त्यामुळे सरकार अजून किती युवकांचे बळी घेणार आहे असा सवाल मराठा समाजातील तरुण या सरकारला विचारत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...