जळगाव जामोद येथे शांततेत बाप्पाला निरोप...

जळगाव जामोद येथे शांततेत बाप्पाला निरोप...

आधुनिक केसरी न्यूज 

सागर झनके 

जळगाव जा : जळगाव शहरात वायलीवेस येथे १७ सप्टेंबर  रोजी झालेल्या गणेश मिरणुकी दरम्यान दोन गटात वादावादी  होऊन  तुफान दगडफेक  करण्यात आली. त्यामुळे जळगाव शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.अखेर आज पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जळगाव शहरातील संपूर्ण गणेश मंडळाच्या मिरवणुका अगदी शांततेत पार पडल्या.काल ढोल ताशाच्या गजरात जळगाव  शहरात गणपतीबाप्पाची मिरवणुक सुरू होती.दरम्यान दोन गटात वादावादी  झाली.त्याचे रूपांतर  दगडफेकित झाले.दोन्ही गटाकडील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली.त्यामुळे पोलीसांना मनुष्यबळाचा वापर करावा लागला.त्यात मोठ्या प्रमाणावर चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून  दुचाकी गाड्यांचे ही नुकसान झाले.

मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने जळगाव शहरातील संपूर्ण गणेश मंडळांनी मिरवणूक जागेवरच थांबवून जोपर्यंत आरोपीस अटक करत नाही तोपर्यंत मिरवणूक काढणार नाही असा पवित्रा घेतला. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार विद्यमान संजय कुटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन गणेश मंडळांना भेट दिली.जोप्रयंत या घटनेस जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मिरवणूक काढली जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर दुसऱ्या दिवशी गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलीस  बंदोबस्तात जळगाव शहरातून शांततेत मिरवणूक काढण्यात आली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...