वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या त्रासामुळे युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष 

वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या त्रासामुळे युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

आधुनिक केसरी न्यूज 

ज़ैनुल आबेद्दीन

मेेहकर : डोणगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने बुलढाणा येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या मुलाचे प्राण वाचले आहेत मात्र सतीश मुळे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे मात्र पोलीस अधिकारी सतीश मुळे यांना पाठीशी का घालतात असा प्रश्न उपस्थित होत आहे सतीश मुळे हे मेहकर येथे कार्यरत असताना त्यांनी अनेकांकडे पैशाची मागणी केली होती तर असाच प्रकार 2021 मध्ये मेहकर येथे घडला होता एका रेतीची वाहतूक करणाऱ्या युवकाकडे पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांनी पन्नास हजार रुपये मागितले होते त्यावेळी त्या गरीब युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस सतीश मुळे यांची ताबडतोब बुलढाणा मुख्यालय येथे बदली करण्यात आली होती मेहकर येथे सतीश मुळे यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचे बोलल्या जात आहे तर काही पत्रकाराकडून सुद्धा सतीश मुळे यांनी पैसे घेतल्याची सुद्धा माहिती आहे तर आता  १८ सप्टेंबर रोजी १२: १५ वाजेच्या सुमाराची घटना घडली. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारा तरुण हा मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील राहणार आहे. वेळीच पोलिसांनी सविस्तर वृत्त असे की बिलाल शाह मोहसीन शहा असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी व खंडणीची मागणी हेड कॉन्स्टेबल सतीश मुळे यांनी दिल्याची तक्रार बिलाल शाह या तरुणाने केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने तरुणाने आज टोकाचे पाऊल उचलले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांचा कारभार नेहमीच वादग्रस्त ठरलेला आहे गोरगरिबांच्या रक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पैशाची मागणी होत असेल तर भ्रष्टाचार कसा थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या विरोधात अनेक वेळा वरिष्ठांकडे नियमानुसार तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र पोलीस विभागाकडून आपलाच कर्मचारी असल्यामुळे कारवाई झाल्याचे दिसून आले नाही इतर काही ठिकाणी जर पैसे मागितले तर पोलीस विभाग ताबडतोब कारवाई करतात मग पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन गुन्हा दाखल का होत नाही असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे आज रोजी घडलेल्या प्रकारामुळे नवीनच आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियमानुसार व कायद्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्यावर कारवाई करतात का किंवा पुन्हा आपलाच कर्मचारी असल्यामुळे पाठीशी घालतात याकडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागून राहिले आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...