पोलीस शिपायाने घेतली गुगल पे वरून ३ हजारांची लाच ; लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कठोर कारवाई...

पोलीस शिपायाने घेतली गुगल पे वरून ३ हजारांची लाच ; लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कठोर कारवाई...

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : गुगल पे वरून ३ हजारांची लाच स्विकारणार्‍या एका पोलिसाला मुंबईच्या लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने अटक केली आहे. मंगेश नामदेव राक्षे (४२) असे या पोलिसाचे नाव असून तो मिरा रोड येथील काशिगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार हे वाहनचालक आहेत. मंगळवार ११ सप्टेंबर रोजी ते कल्याण येथून परतत असताना काशिमिरा येथे त्याचे वाहन बंद पडले होते. ते वाहन त्यांनी रस्त्याच्या कडेला उभे केले होते. त्याचवेळी काशिगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मंगेश राक्षे या पोलीस शिपायाची दुचाकी या वाहनाला धडकली. त्यामुळे राक्षे आणि तक्रारदार वाहनचालक यांचा वाद झाला.

राक्षे याने तक्रारदाराचा वाहन परवाना काढून घेतला आणि तो परत हवा असल्यास १० हजार रुपयांची लाच देण्यास सांगितले. तक्रारदाराच्या बॅंक खात्यात त्यावेळी ३ हजार रुपये होते. राक्षे याने ते ३ हजार रुपये एका पानवाल्यास गुगल पे द्वारे पाठवायला सांगितले. मात्र बुधवारी राक्षे याने पुन्हा तक्रारदाराकडे उर्वरित ७ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने वरळीच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडे याबाबत तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तक्रार प्राप्त होताच सापळा लावला. मात्र सापळा लावता असताना राक्षे याला संशय आला होता. परंतु लाचलुचपत खात्याच्या पोलिसांनी राक्षे याला रंगेहाथ अटक केली. राक्षे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या मुंबई विभागाचे  सहाय्यक आयुक्त रवींद्र बाबर, पोलीस निरीक्षक अविनाश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...