अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी रामतीर्थ पोलिसात एका विरुद्ध पोस्को दाखल ------------------------------------
आधुनिक केसरी न्यूज
तानाजी शेळगांवकर
नायगाव : नरसी येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या नरसी येथील साईनाथ जारीकोटे यांच्या विरुद्ध देण्यात आलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात पोस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नरसी येथील अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी साईनाथ जारीकोटे हा नेहमी तिच्या पाळतीवर असायचा.कॉलेजसह ती जिथे जाईल तिथे तो पाठलाग करायचा.तुला मी खुश ठेवतो, भारी मोबाईल देतो.मला एकांतात भेट.नाहीतर तुझ्या नावाने चिट्ठी लिहून आत्महत्या करेल अशी धमकी देत असल्यामुळे घाबरून जावून ती अल्पवयीन मुलगी साईनाथ याला एकांतात भेटायला जायची.
ही अल्पवयीन असलेली मुलगी एकांतात आल्यानंतर आरोपी साईनाथ हा त्याच्या मोबाईल मधील अश्लील चित्रफीत तिला दाखवून जबरदस्ती तिला विवस्त्र करायचा अशा वेळी तु विरोध करण्याचा प्रयत्न केलीस तर तुझा गळा दाबून तुला जीवे मारतो अशी धमकी देऊन नको तिथे हात लावून बळजबरी देखील करायचा.
तुझे माझ्याजवळ फोटो आहेत.मला भेटली नाहीस तर तुझी समाजात बदनामी करतो अशी धमकी देवून साईनाथ याने जवळपास वर्षभर त्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला.वारंवार होणारा हा प्रकार असह्य झाल्याने अखेर सोमवारी त्या अल्पवयीन मुलीने रामतीर्थ पोलीस ठाण्यात आरोपी साईनाथ जारीकोटे याच्या विरुद्ध फिर्याद नोंदवली.
त्यावरून रामतीर्थ पोलिसांनी आरोपी युवक साईनाथ जारीकोटे रा.नरसी याच्यावर कलम 76,78,351 सह पोस्को ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी आरोपी युवक साईनाथ जारीकोटे यास अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ही सपोनि. श्रीधर जगताप हे करीत आहेत.
Comment List