मकरसंक्रांत निमित्त पैठणला नाथ महाराज समाधी व आपेगावी माऊली मंदिरात पतंग,फुलांची आरास 

मकरसंक्रांत निमित्त पैठणला नाथ महाराज समाधी व आपेगावी माऊली मंदिरात पतंग,फुलांची आरास 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण  : नवीन वर्षाच्या प्रारंभाला येणारा पहिला सण म्हणजे महिलांचा मकर संक्रांतीचा सण. या सणाचे औचित्य साधून पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी व श्रीक्षेत्र आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज जन्मस्थान  (ता. पैठण ) येथे फुले,पतंगानी मंदिर सजवण्यात आले. ओवसाण्यासाठी व दर्शनासाठी  महीलांची मोठी गर्दी होती
मकरसंक्रांतीच्या सणामुळे पैठण येथील नाथांच्या वाड्यातील मंदिर,नाथ महाराज समाधी मंदिर,आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज जन्मस्थळ मंदिरात सकाळपासून  तालुक्यातील अन्य भागातील सुवासिनी दर्शन, ओवासणे व हळदी कुंकुवासाठी गर्दी केली होती. मकर संक्रांती निमित्ताने महिलांनी एकमेकांना चुडासह अन्य विविध वस्तू व तिळगूळ देत पारंपरिक पध्दतीने मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच 'क्लायमॅट चेंज'...
डॉ.बाबा आमटे यांच्या आनंदवनाला ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी तातडीने वितरित
मोठी बातमी : शरद पवारांचा अमित शाहांवर 'वार'.... देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार....
मकरसंक्रांत निमित्त पैठणला नाथ महाराज समाधी व आपेगावी माऊली मंदिरात पतंग,फुलांची आरास 
लाचखोरी : बल्लारशाह पोलीस उपनिरीक्षकाविरुध्द ( ACB ) अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई 
AID ऍडव्हांटेज विदर्भ परिषद औद्योगिक विकासाची आणि युवकांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारा मार्ग : आ किशोर जोरगेवार
चंद्रपूरमधून होईल ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद : आ.सुधीर मुनगंटीवार