गोमाल गाव हादरलं पाच वर्षाच्या चिमुकलीने घेतला अखेरचा श्वास ; मृत्यूचं कारण अस्पष्ट...

गोमाल गाव हादरलं पाच वर्षाच्या चिमुकलीने घेतला अखेरचा श्वास ; मृत्यूचं कारण अस्पष्ट...

आधुनिक केसरी न्यूज 

सागर झनके 

जळगाव जा : १७ सप्टेंबर रोजी  गोमाल येथील जानकी विक्रम चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा गोमाल हादरलं.आठ दिवसा अगोदर गोलमाल मध्ये  दोन बालकांसह एका तरूणीचा करून अंत झाला.ती घटणा ताजी असतांनाच आज पुन्हा एकदा जानकी या चीमुकलीने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूचं कारण मात्र अद्यापही समजलं नाही.

जानकीचा मृत्यू कशाने झाला हे कोणी सांगू शकत नाही. 17 सप्टेंबर च्या मध्यरात्री जानकीला भल्या  पहाटे जाग आली. तीला अस्वस्थ वाटत होतं.तीने आईला उठवले.त्या लहानग्या जीवाला वाटलेही नसेल की,मला  न्यायला काळ आपल्या  दारात तीची वाट पाहत असेल.तीने होणारा त्रास तीच्या आईला सांगितला.दोन तीन वेळा संडासला गेली.दोन तीन उलट्या केल्या.तीच्या आई वडीलांना काय करावे कळत नव्हते.तोवर दिवस उजेडायला आला होता.जानकीची प्रकृती एकदमच खालावली होती. दिवस निघता निघता तीला गावात सुरू असलेल्या आरोग्य शिबिरात नेले.पण तोवर  जानकिची प्राणज्योत मालवली होती.ती जग सोडून दूर निघून गेली होती.कधीही परत न येण्यासाठी.डाॅक्टरांनी तीला तपासले असता जानकीचा अगोदरच  मृत्यू झाल्याचे सांगितले. तिच्या हृदयाची धडधड केव्हाचीच बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जानकी आता या जगात नाही .ती सर्वांना सोडून दूर निघून गेली.आई-वडिल, आपल्या लहानग्या भावंडांना सोडून सातासमुद्रापार निघून गेली.तीच्या घराचं आंगन पोरक  झालं.जीथ ती खेळत होती त्याच जागेवर आता तीची अंत्ययात्रा भरली होती.लोक रडत होते.आसवांना वाट मोकळी करून देत होते.जानकिचा अवाज आता  कायमचा मुका झाला होता.ती शांत झोपी गेली होती .‌रात्रीच्या गडद अंधारात ती दिसेनाशी झाली होती.काळ्याकुट्ट रात्रीने तीला घेरलं होतं. उमलण्या अगोदरच नियतीने त्या कळीला चूरगाळून टाकले.

जानकीच्या जाण्याने सारं गाव हादरलं. जानकी चा मृत्यू कशाने झाला कुणालाच कळलं नाही. या अगोदरही गोमाल या आदिवासी गावात दोन बालकासह एका तरुणीला आपल्या प्राणास मुकावे लागले त्याचंही ठोस कारण अद्याप समोर आलं नाही. मृत्यू कशाने होत आहे कुणी सांगू शकत नाही.पण निरापराध जीवांचा मात्र बळी जात आहेत.हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...