गर्भवती महिलेसाठी रुग्‍णवाहिका उपलब्ध नसल्याने अर्भकासह मातेचा मृत्‍यू...

गर्भवती महिलेसाठी रुग्‍णवाहिका उपलब्ध नसल्याने अर्भकासह मातेचा मृत्‍यू...

आधुनिक केसरी न्यूज 

अमरावती : मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्‍यू कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्‍यात येत असल्‍याचा दावा सरकारकडून करण्‍यात येत असला तरी, बालमृत्‍यू, मातामृत्‍यूचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. गर्भवती महिलेसाठी रुग्‍णवाहिका वेळेवर न मिळाल्‍याने अर्भकाचा मृत्‍यू झाला आणि त्‍यानंतर मातेचाही मृत्‍यू झाल्‍याची दुर्दैवी घटना मेळघाटातील दहेंद्री या गावात घडली आहे. कविता अनिल साकोम (२०, रा. दहेंद्री) असे मृत विवाहितेचे नाव आहे. कविता हिची शनिवारी दुपारी रुग्‍णवाहिका न मिळाल्याने घरीच प्रसूती झाली होती. बाळाचा पोटातच मृत्‍यू झाला होता. शासकीय रुग्‍णवाहिका न मिळाल्‍याने तिला खाजगी वाहनाने चुर्णी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर अचलपूरच्‍या उपजिल्‍हा रुग्‍णालयात आणि नंतर अमरावतीच्‍या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. मात्र रविवारी सकाळी कविता हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दहेंद्री गावात आरोग्य विभागाने रुग्‍णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. तीन दिवसांपूर्वी सोनोग्राफीसाठीसुद्धा आरोग्य विभागाने रुग्‍णवाहिका उपलब्ध करून दिली नव्हती, असा आरोप महिलेच्या सासू व पतीने केला आहे. कविता हिचा पती अनिल साकोमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली होती. आम्ही रुग्‍णवाहिकेसाठी फोन केला मात्र रुग्‍णवाहिका आली नाही.

त्यामुळे पत्नीची घरीच प्रसुती झाली. बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी खासगी गाडी घेऊन पत्नीला चुर्णी येथे रुग्णालयात घेऊन गेलो. तिथून तिला अचलपूर येथे नेले. तेथून डॉक्‍टरांनी अमरावती येथे हलविण्‍यास सांगितले, पण तिथे उपचारादरम्‍यान पत्‍नीचा मृत्‍यू झाला. वेळेवर रुग्‍णवाहिका मिळाली असती, तर तिचे प्राण वाचू शकले असते, असे कविताच्‍या पतीचे म्‍हणणे आहे. मेळघाटात गेल्‍या एप्रिल ते ऑगस्‍ट या पाच महिन्‍यांत १३ बालमृत्‍यू, चार उपजत मृत्‍यू तर दोन मातांचा मृत्‍यू झाला आहे. चिखलदरा तालुक्‍यातील जामुननाला येथील एक महिन्‍याच्‍या बालकाचा त्‍याच्‍या आईच्‍या मृत्‍यूनंतर २२ दिवसांनी गेल्‍या २२ ऑगस्‍ट रोजी चिखलदरा येथील रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. अजूनही मेळघाटातील बालमृत्‍यूंना आळा घालता आलेला नाही.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...