एका लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर अधिकारी सीबीआय कोठडीत...

एका लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर अधिकारी सीबीआय कोठडीत...

आधुनिक केसरी न्यूज 

नाशिक : धुळ्यातील दूध उत्पादक कंपनीच्या उत्पादनास प्रमाणित करण्यासंबंधीचे (ॲगमार्क) प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकरोड येथील पणन व तपासणी संचालनालयातील वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. न्यायालयाने संशयिताची पाच सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात धुळे येथील दुधापासून विविध उत्पादने बनविणाऱ्या कंपनीने तक्रार केली होती. त्याआधारे सीबीआयने विशाल तळवडकर आणि ॲग-मार्क नाशिक कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कंपनीने आपल्या उत्पादनास ॲग-मार्क परवान्यासाठी अर्ज केला होता. बराच काळ लोटूनही हे प्रमाणपत्र दिले गेले नव्हते. नाशिकरोडच्या आनंदनगर भागात पणन व तपासणी संचालनालयाचे कार्यालय आहे. येथील अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागताना व स्वीकारताना वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला रंगेहात पकडण्यात आले. स्वत:सह इतरांसाठी त्याने ही लाच मागितल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. संशयिताचे कार्यालय आणि निवासस्थानी झडती पथकाने घेतली. तळवडकरला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर आले. न्यायालयाने त्याला पाच सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस