स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक गणेश मंडळाचे स्वागत करत दिला गणरायाला अखेरचा निरोप...

स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक गणेश मंडळाचे स्वागत करत दिला गणरायाला अखेरचा निरोप...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथील यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचावरून सपत्नीक गणेश भक्तांसह गणेश मंडळांचे स्वागत केले. तसेच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला.

10 दिवसांच्या मुक्कामा नंतर आज गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदा ही नागरिक व गणेश मंडळांच्या स्वागतासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता. गणेश मंडळ स्वागत मंच्याजवळ पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले.  राज्याला संपन्नतेचे आणि भरभराटीचे दिवस येवोत अशी मनोकामना बाप्पाला अखेरचा निरोप देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...