महाराष्ट्र राज्यातील ओबीसी मुलांना 100% शिक्षण शुल्क माफी द्या -राष्ट्रीय ओबीसी महासंघ...

महाराष्ट्र राज्यातील ओबीसी मुलांना 100% शिक्षण शुल्क माफी द्या -राष्ट्रीय ओबीसी महासंघ...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : दिनांक 6 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी 5 वाजता , देवगिरी वर झालेल्या, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ स्तरीय बैठकीत झालेल्या चर्चेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी , राज्यातील ओबीसी मुलांना 100% स्कॉलरशिप देण्याचे अभिवचन दिले. या बैठकीत प्रश्नांची सुरुवात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्याचे 29सप्टे.24च्या बैठकीत आश्वासन दिले होते. त्याच मुद्दाला धरुन सुरुवात केली. तसेच केंद्र सरकारने 50%ची अट शिथिल करण्यसंबधाने राज्य सरकारचे धोरण काय या बाबतीत पाठपुरावा करीत आहोत. शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी 8लाख रु ची अट, तसेच नॉन-क्रीमीलेअरची अट या दोन्ही अटी ऐवजी फक्त नॉन -क्रीमीलेअरची अट तेवढी ठेवण्यात यावी यावर अर्थमंत्रालयाकडुन अहवाल आल्यानंतर फक्त एकच अट ठेवण्यात येईल असे सांगितले.

या शिवाय ओबीसी वसतीगृहाच्या बाबत जो वेळकाढूपणा सुरू आहे त्यावर लवकर कार्यवाही करण्यात यावी, विद्यार्थी वर्गाच्या भावना तीव्र झाल्या आहेत असेमहासंघाचे महासचिव सचिन राजूरकर ह्यांनी सांगितले. तसेच ज्या अधिकार्यांचे निलंबन केले आहे त्यांना पुर्वव्रत कामावर रुजू करण्यात यावे ही सुध्दा मागणी लावून धरला, ओबीसी विध्यार्थ्यांना 2002-2003 पासून मुला मुलींना अनुसूचित जाती -जमातीच्या धर्तीवर 100% शिक्षण शुल्क माफ करण्यात करण्यात आली होती, 2010नंतर 50% करण्यात आली, आता मुलींना 100%शिक्षण शुल्क माफ करण्यात आली ती मुलाना सुद्धा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली परदेशात उच्च  शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेऊन जाणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याची संख्या  75 वरुन 100करण्यात यावी खाजगी कंत्राटी पद्धतीने भरती बंद करून स्पर्धा परीक्षा घेऊन कायम स्वरुपी भर्ती करण्यात यावी. या शिवाय ओबीसींच्या अनेक समस्यांना हात घालून त्या लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे असे सर्वांनी सांगितले. 

या बैठकीत  महासंघाचे समन्वयक  डॉ अशोक जिवतोडे,सहसचिव शरद वानखेडे, महिला अध्यक्षा सुषमा भड, कार्याध्यक्षा डॉ शरयु तायवाडे, अँड रेखाताई बारहाते, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, चप्रदेश कार्याध्यक्ष येथुन दिनेश चोखारे, प्रा. कुकडे,, अमरावती प्रकाश साबळे, अध्यक्ष कीसान महासंघ,, बुलढाणा विजय दवंगे,सुरज बेलोकार, गोंदिया बबलू कटरे, परमेश्वर राऊत, शकील पटेल, राजु चौधरी, विजय पिदूरकर उमेश शिजनगुडे, संजय मत्ते, सुरेश भांडेकर, दादाजी चुधरी शशिकांत वैद्य, विष्णू इतनकर, डॉ राजेश्वर उकारे अरविंद इंगोले, प्रवीण तायडे, सविता भेदरकर, प्रवीण वानखेडे, गणेश आवारी, दीनदयाळ दमाये, डॉ रामलाल गहाने इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, अकोला,भंडारा, गडचिरोली, वर्धा, येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे व इतर ओबीसी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.बैठक यशस्वीपणे पार पडली,पुढील बैठक मुंबई येथे घेण्याचे सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद. CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद.
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रकरणाबाबत नेहमीच सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. गेल्या काही...
माजी मुख्यमंत्री कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे.
काँग्रेस कार्यालयावर भाजपचा भ्याड हल्ला, बहुमताच्या जोरावर ही मस्ती चालणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!
माता महाकालीची महा आरती करत आमदार किशोर जोरगेवार यांनी दर्शवली विविध सामाजिक उपक्रमात उपस्थिती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया..!