शिर्डी बसस्थानकावर प्रतिकात्मक लेंडीबाग ; साईभक्त भाविकांसाठी आठवणींचा ठेवा
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : शिर्डी येथे येणारे रोज हजारो साईभक्त शिर्डी येथे येत असतात त्या साईभक्त भाविकाना साईचे समकालीन भक्त व लेंडी बागेचा इतिहास माहिती व्हावा यासाठी शिर्डी बसस्थानकाच्या अंतर्गत आवारात साईअमृत व स्व लहाणुबाई अमृतराव गोदकर चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीने काही दिवसापूर्वी लेंडी बागेत झाडांना पाणी घालणारे साईबाबा व त्यांच्या समावेत स्वर्गीय समकालीन साईभक्त वामनदादा गोंदकर लेंडी बाग व हिरवीगार बाग व साईची आकर्षक भावमुद्रा असलेला प्रतिकात्मक पुतळा व त्यांच्या समावेत स्व वामनराव गोदकर असे दोन पुतळे झाडांना पाणी टाकत असल्याचा तो क्षण हिरवीगार लेंडी बाग कमीत कमी जागेत उभी करून भावि पिढीला व साईभक्त भाविकाला इतिहासाची माहिती प्रेरणादायी ठरत आहे
अधिक माहिती अशी की साईचे प्रेम सहवास ज्याना मिळाला त्यात शिर्डी येथील समकालीन साईभक्त श्री वामनदादा गोदकर महत्त्वाचे व्यक्ती होत साईबाबा ज्या पाच घरी भिक्षा मागत त्यापैकी पहिले घर वामनदादाचे श्री साईबाबानी वामनदादा व मुरलीधर गोदकर याच्या जागेत स्वत लेंडी बाग तयार केली वामनदादा रोज दोन घडे देत साईबाबा ते घडे घेऊन आपल्या हाताने लेंडीबागेतील झाडांना पाणी घालायचे व ते घडे फोडून टाकत साईबाबा व् वामनदादा या हा दिनक्रम होता याचा उल्लेख साई सच्चारित्र मध्ये देखील आहे हि सर्व माहिती शिर्डी बसस्थानकावर प्रतिकात्मक आकर्षक लेंडीबागेतील उभारलेला प्रसंग रोज शिर्डी येथे येणारे जाणारे हजारो प्रवासी व साईभक्त बघत असतात
Comment List