पत्रकारांना एका समूह प्रमाणे काम करण्याची गरज : संदिप पारोळेकर
बी. एन. एन. महाविद्यालयात मराठी पत्रकार दिन साजरा
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : दि. 6 जानेवारी, भिवंडी आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेचे स्वरुप बदलले असून अनेक नव्या करियरच्या संधीदेखील उपलब्ध झाल्या आहेत. आजच्या पत्रकारांना एका समूह प्रमाणे काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने ज्ञानाची घेवाण देवाण करून आपल्या ज्ञानात भर घातली तरच आपण वाचकांना चांगली माहिती देऊ शकतो. असे मत टाइम्स नाऊच्या डिजिटल आवृत्तीचे संपादक संदिप पारोळेकर यांनी व्यक्त केले.
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी. एन. एन. महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाच्या वतीने आज मराठी पत्रकार दिन तथा दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस आर. एन. पिंजारी यांनी आजच्या काळात पत्रकारितेचे महत्त्व सांगून पत्रकारांनी बातमीचे मूल्य ओळखून प्रसिद्धी द्यावी. पूर्वीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात खूप तफावत दिसून येते ही दरी भरून काढण्याचे आव्हान आजच्या प्रकारापुढे आहे. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, पर्यवेक्षक मनोहर महाले, प्रा. सुरेश अहिरे, प्रा. रागीब मोमीन, प्रा. शिवम भानुशाली आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मयोगीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमा निमित्ताने फोटोग्राफी आणि रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाहिले, दुसरे, तिसरे नंबर येणार्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर निकम यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. बाळासाहेब पगारे तर पाहुण्यांचा परिचय प्रा. अंकुश चव्हाण यांनी दिले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रा. गणेश पानझाडे यांनी मानले.
Comment List