विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...

विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...

आधुनिक केसरी न्यूज 

नाशिक : अपिल आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत केदारे हे १० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे भावाचे पत्नी ह्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक यांचे मार्फतीने स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अपील सुरू होते. सदर अपिलाचा निकाल हा तक्रारदार यांच्या वहीनीच्या बचत गटाच्या बाजूने लागल्याने सदर अपिल आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता राजेंद्र भागवत केदारे यांनी दिनाक २४ सप्टेंबर रोजी १५ हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडी अंती १० हजार रुपये पंच साक्षीदारांचा समक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

यातील तक्रारदार यांचे भावाचे पत्नी ह्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक यांचे मार्फतीने स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अपील सुरू होते. सदर अपिलाचा निकाल हा तक्रारदार यांच्या वहीनीच्या बचत गटाच्या बाजूने लागल्याने सदर अपिल आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता आरोपी लोकसेवक यांनी दिनाक 24/9/2024 रोजी 15000/- रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10000/- रुपये पंच साक्षीदारांचा समक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.आलोसे यांचे सक्षम अधिकारी- प्रधान सचिव , अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,मंत्रालय 32,मुंबई . हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. सापळा अधिकारी  राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक सापळा पथक पो. हवा.प्रफुल्ल माळीपो.ना.विलास निकम चालकपो.हवा.संतोष गांगुर्डे आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान