तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती !
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : खरीपातील लागवडीसाठी सुरवातीला समाधानकारक पाऊस पडल्यावर तुर,कपाशी,सोयाबीन अन्य खरीपातील पिके बहरात येवून शेतशिवार फुलले होते.त्यामुळे शेतकरी आनंदी होता.परंतु पोळ्या नंतरच्या परतीच्या पावसाने खरीपातील पिकाचे अतोनात नुकसान झाले.हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असताना आता शेतकर्याची चिंता वाढली असुन तुरीच्या तुर्हाट्या अण कापसाच्या वाती झाल्याचे चित्र सर्वत्र शेतात दिसत आहे.याबाबत महसूल,तसेच कृषी विभाग मात्र काळजी वाहु दिसत नसल्याने आता या झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान तर झालेच त्यामुळे पिक पाहणी,पंचनामे न करता खरिपातील सर्वच पिकाना सरसकट मदतीची याचना शेतकरी करत आहे.
याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ही शासनाकडे मागणी करत असल्याचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी सांगितले,नुकतीच त्यांनी खासदार डॉ.कल्याण काळे यांची भेट घेवुन खरिपातील नुकसान झालेल्या पिकाची सविस्तर माहिती देत सरकार कडुन शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मागणी केली.
Comment List