प्रेरणा कॉलेज ऑफ सायन्स,कॉमर्स अँड आर्ट्स येथे वाचन प्रेरणा दिन साजरा...
आधुनिक केसरी न्यूज
नागपूर : येथील प्रेरणा कॉलेज ऑफ सायन्स,कॉमर्स अँड आर्ट्स येथील विद्यार्थ्यांसोबत वाचन प्रेरणा दिनानिमित्त भिलार पुस्तकाचे गाव एक यशोगाथा विषयावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी,श्री.विनय मावळणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे संचालक, डॉ.प्रवीण जोशी यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेपासून लागलेली वाचनाची आवड कशी वाढत गेली यावर आपले प्रास्ताविक सादर केले. लोकसहभागातून साकारलेला प्रकल्प कश्या पद्धतीने ग्रामस्थांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल झाला आहे याची उदाहरणे त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितपणे आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मुख्य शैक्षणिक अधिकारी आणि संचालक आय.आय.डी.एल प्रा.अमेय सुनिल महाजन व्यक्त केले.
Comment List