आमच्या प्रगतीला बाधा आणण्यासाठीच विघ्संतोषींचा हा खोडसाळपणा : पदमसिंहजी राजपुरोहित
आमची मिठाई सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णच ; ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये....!
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर गेल्या 30 वर्षांपासून आम्ही आमच्या ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिठाई आणि इतर उत्पादन देत आहोत. ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास सार्थक करत आम्ही कधीही या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी आमच्याविरोधात कारस्थान रचून आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आमच्या ग्राहकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कधीही त्यांचा विश्वासघात करणार नाही. झालेल्या खोडसाळपणाविरोधात आम्ही सायबर क्राईमकडे कायदेशीर तक्रार नोंदवली असून, यामागील गुन्हेगाराचा चेहरा लवकरच समोर येईल. ग्राहकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन शहरातील मिठाई उत्पादनात अग्रगण्य असलेल्या मधुर मिलन स्विट्स मिठाई प्रतिष्ठानचे संस्थापक आणि सर्वेसर्वा श्री पदमसिंहजी राजपुरोहित यांनी केले आहे.
मिठाईच्या ट्रे मध्ये उंदीर फिरत असल्याचा फेक व्हिडीओ (खोटारडा) नुकताच व्हायरल झाला होता. यात मधुर मिलन स्विट्स मिठाईचे नाव जोडण्यात आले होते. या घडलेल्या प्रकाराबद्दल अधिक माहिती देताना राजपुरोहित म्हणाले कि, आमचे मधुर मिलन मिठाई हे प्रतिष्ठान ३० वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत सुरु आहे. या काळात आम्ही असंख्य ग्राहक जोडले आहेत. आमच्या उत्पादनाची शुद्धता आणि गुणवत्ता पाहून ग्राहकांचा आमच्यावर विश्वास आहे. मात्र हा विश्वास तोडण्याचा काही विघ्नसंतोषी मंडळी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मधुर मिलन मिठाईचे संस्थापक संचालक पदमसिंहजी राजपुरोहित आणि डुंगरसिंहजी राजपुरोहित यांनी ३० वर्षांपूर्वी शहरात हा व्यवसाय सुरु केला होता. पदमसिंहजी राजपुरोहित पुढे म्हणाले, प्रारंभी भाड्याच्या जागेवर सुरु केलेले हे दुकान उत्पादनांची गुणवता आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर तीन भव्य शाखांपर्यंत वाढविले. मधुर मिलन मिठाईची एक शाखा सातासमुद्रापार दुबई येथेही सुरु करण्यात आलेली आहे. तेथेही ग्राहकांचा असाच विश्वास आम्हाला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी आमच्या मधुर मिलन स्विट्स मिठाईचे नाव लावून एक फेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडीओ दिल्ली येथील अग्रवाल स्वीट्स यांच्या दुकाना मधील २ वर्षापुवीचा होता. या घटनेची नवभारत टाइम्स, हिंदुस्थान टाइम्ससह स्थानिक टीव्ही चॅनल्स व प्रसारमाध्यमांनी याची गंभीर दखल घेतली होती. या विघ्नसंतोषी मंडळींनी ऐन सणासुदीच्या दिवसात असा खोडसाळपणा केल्याचे पदमसिंहजी राजपुरोहित यांनी वाईट वाटल्याचे म्हटले आहे.
आम्ही ग्राहकांच्या विश्वास आणि प्रेमळ आशिर्वादावरचा हा व्यवसाय उभा आहे. ग्राहकांना शुध्द देशी तूपामध्ये शुद्ध मिठाई देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काजू गजक चे निर्माते म्हणून आमची ओळख आहे. छना टोस्ट हा स्पेशल मिठाईचा प्रकारही आपल्याकडे चालतो. याशिवाय गुपचूप पेढा, रबडी, राजभोग, देशी तुपातले घेवर, फेणी, बंगाली मिठाई असे कितीतरी प्रकार मधुर मिलन स्विट्स मध्ये बनवले जातात. दिपावली सनासाठी विविध प्रकारच्या ड्रायफुड, मिठाई आमचा कारखाना रेल्वे स्टेशन येथे आहे. येथे सर्व कारागीर हा प्रत्येकजण मिठाई तयार करणारा उत्कृष्ट कारागीर आहे. विविध आकर्षक गिफ्ट पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे.
जोधपूर येथून १९९५ साली तत्कालीन जुन्या औरंगाबाद शहरात आम्ही आलो होतो. केवळ एका भट्टीवर आम्ही आमचा व्यवसाय सुरु केला होता. प्रचंड मेहनत आणि ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास या जोरावर मधुर मिलन स्विट्स हे यश आज नावारूपाला आलेले आहे. गर्मीमध्ये लस्सी तर थंडीमध्ये मसाला दूध ही आमची खासियत आहे. याशिवाय दुकानासामोर चटपटी, स्वादिष्ट आणि गुणवत्तापूर्ण पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठीही अनेक विश्वासू ग्राहक गर्दी करत असतात. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उच्च दर्जा, गुणवत्ता यामध्ये आम्ही कधीही तडजोड केली नाही आणि यापुढेही करणार नाही.
आमच्यावरील विश्वास आणि मालाच्या उत्कृष्ट गुणवतेमुळे सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या, कारखाने, कार्यालये तसेच संस्थांमधील कर्मचाऱ्यासांठी आमची मिठाई मागवली जाते मोठया कंपन्यांचाही यात समावेश आहे. शहरातील आमदार, खासदार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठितांच्या कंपन्या / संस्था / घरी आमची मिठाई जात असते. याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे देखील त्यांचा आमच्यावरील विश्वासाचे द्योतक असल्याचे राजपुरोहित यांनी सांगितले.
असोसिएशन सक्रिय नसल्याची खंत
पदमसिंहजी राजपुरोहित पुढे म्हणाले कि, आपल्या शहरात मिठाई असोसिएशन स्थापन आहे. मात्र ते सक्रिय नाही. यातील पदाधिकऱ्यांनी वेळोवेळी बैठक घेतल्या पाहिजेत. मिठाई दुकानदारांच्या समस्या ऐकून घेत त्यावर तोडगा काढला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी केली. असोसिएशन सक्रिय नसल्याने अशा प्रकारचे खोडसाळपणाचे प्रकार घडत असल्याचे ते पुढे म्हणाले.
आमच्याकडे सर्व खाद्य परवाने
आम्ही ग्राहकांना देव मानतो. ग्राहकदेखील आमच्यावर विश्वास ठेवून आमचे उत्पादने खरेदी करतात. कारण आम्ही हा विश्वास सार्थ करतो. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे सर्व आवश्यक परवाने आहेत. याशिवाय उत्पादनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व खबरदारीही आम्ही घेत असतो. २०२२ साली अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट फुडीचा पुरस्काराने आमचा गौरव करण्यात आलेला आहे.
समाजसेसेवेतुन परमार्थ
याशिवाय राजस्थानी प्रकोष्टचे उपाध्यक्ष म्हणून आमची निवड झालेली आहे. राजस्थानातील पथमेड़ा येथील गोशाळेत १ लाख ५६ हजार गायी आहेत. या गोशाळेचे आम्ही आजीवन सदस्यत्व स्वीकारलेले आहे. यातून गोमातेची सेवा देखील आमच्या हातून घडत असते. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चे एम जे एफ अशा अनेक सामाजिक कार्यातही आम्ही आमचा सहभाग देत असतो.
गुन्हेगार जनतेसमोर यायला हवा
या घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही सायबर क्राईमला तक्रार दिलेली आहे. ते आम्हाला सहकार्य करतील अशी खात्री आहेच. आम्ही त्यांचे आभारी राहूत. गुन्हेगाराला पकडून त्याचा खरा चेहरा जनतेसमोर आला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे पदमसिंहजी राजपुरोहित यांनी सांगितले.
Comment List