अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या अम्मांचा सहवास नेहमीच मला लाभला. प्रामाणिकता आणि कष्ट हेच अम्मांचे जीवनमंत्र होते. "अम्मा का टिफिन" या उपक्रमाच्या त्या प्रणेत्या होत्या, ज्यातून अनेक निराधारांना आधार मिळाला. आज त्यांच्या निधनाने निराधारांचा खरा आधार कायमचा हरपल्याची भावना लोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
अम्मांच्या नावाने सुरू असलेले अनेक सामाजिक उपक्रम समाजात सेवेचे कार्य करत होते. "अम्मा की दुकान" या उपक्रमातूनही त्यांनी गरजूंच्या सेवेसाठी योगदान दिले. नेहमी हसत, विचारपूस करणाऱ्या अम्मा आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांचे मातृतुल्य छत्र हरपले आहे, आणि कधीही न भरून निघणारी मोठी हानी सामाजिक क्षेत्राची झाली आहे.
Comment List