नवरात्रोत्सव विशेष : कुटुंब सांभाळत देशसेवा करणारं खाकीतलं आजचं रूप
पोलीस संगीता माने यांच्यासाठी नवरात्रोत्सवाची पाचवी माळ
आधुनिक केसरी न्यूज
सौ. किशोरी शंकर पाटील
सातारा : पोलीस संगीता अजित माने यांच्या माहेरी वडील शासकीय सेवेत व आई पोलीस त्यात त्यांना पाच मुले त्यामुळे घरकामात मदत करून शिक्षण जिद्दीने पुर्ण केले. १९९१ साली सातारा येथे पोलीस दलात भरती झाले,नऊ महिन्यांचे ट्रेनिंग पार पाडून सातारा पोलीस म्हणून कार्यरत झाले. सन १९९३ ला पती अजित राजाराम माने यांच्याशी विवाह झाला.१९९६ साली पहिला मुलगा झाला. पती व त्या पोलीस खात्यात असल्यामुळे तसे पाहिल्यास बाळासाठी वेळ मिळायचाच नाही.
३ महिन्याच्या रजेनंतर ड्युटीवर जाताना परत केव्हा बाळाला पहायला मिळेल याची ग्यारंटी नसायची मुलाला संगीता ताईची आजी सांभाळायच्या काळजी घ्यायच्या त्याचे माहेरचे लोक ही मदत करायचे सासू सासरे गांवी होते शिवाय वयोवृद्ध त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यातच सन १९९८ ला दुसरा मुलगा शौर्यशील याचा जन्म झाला. मिस्टरांची व त्यांची चौवीस तास ड्युटी असताना रात्रपाळीला जाताना मुलांना झोपवून टिव्ही चालू ठेवून बाहेरून कुलूप लावून जायचे जेणेकरून मुले उठली तर घाबरू नयेत वरचेवर येवून मुले उठलीत का हे पहायला पती सायकल वरून दोनचार फे-या तरी मारत मुलांच्या शाळेत पालक मिटींग एकदाही जाता आले नाही वारंवार बदल्या, ड्युटी बाहेरचे बंदोबस्त वगैरे यात अतिशय धावपळ व्हायची.
मोर्चे,दंगल,सणवार बंदोबस्त हे करता करता मुले कधी मोठी झाली कळलेच नाही त्यांचे बालपण नीट नाही बघता आले याची खंत त्यांच्या मनात आहे समाज सेवेचा परिपाक म्हणून की काय दोन्ही मुले उच्च शिक्षित झाली शिक्षण व मुलांवर चांगले संस्कार, सुजाण नागरिक घडवणे.हेच ध्येय मनांत होते. आज या मितीला सुखी आनंदी कुंटूब असल्याचा सार्थ अभिमान त्यांना आहे.शिवाय समाजाची सेवा ही नोकरी द्वारे करून समाज ऋणातून उतराई होते याचा आनंद ही आहे.
Comment List