महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...

महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : दि.०१ तिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या इंदोरा (खुर्द) येथील महिला सरपंच सरीता सुनिल तुमसरे यांना आज १ आॅक्टोंबरला पाच हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेेहाथ पकडले असून तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तक्रारदार हे इंदोरा(खुर्द) येथीलच रहीवासी असून ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे मार्च ते जून या चार महिन्याचे मानधन ५३२०० रुपयाचा धनादेश ग्रामसेवक यांनी स्वतःची स्वाक्षरी करुन तक्रारदाराकडे दिला.तक्रारदार त्या धनादेशावर स्वाक्षरीकरीता सरपंचाकडे गेले असता त्यांना पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया  येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.त्या तक्रारीच्या आधारे आज मंगळवारला सापळा रचून महिला सरपंच सरीता तुमसरे यांना पाच हजार रुपये पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...