चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...

चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपूरच्या शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतल्यानंतर आता चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) निकिता ठाकरे यांची शिक्षणाधिकारी या पदावरून उचल बांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आता शालेय शिक्षण मंत्रालयाने चंद्रपूर  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदी नागपूर येथून महसूल विभागातील राजू रमाकांतराव पातळे यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेला शिक्षण विभाग (माध्यमिक) हा भ्रष्टाचाराचे माहेरघर म्हणूनच कुरूपरिचित झाला होता. या कार्यालयातील कोणतीही फाईल ही वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकतच नव्हती. या आधीचे शिक्षणाधिकारी डोर्लीकर, कल्पना चव्हाण यांच्यावरही  आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. शिवाय विधानसभेतही या संदर्भात प्रश्न उचलण्यात आले होते. हा विभाग म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळ्यांचेच हात ओले करण्याचा विभाग म्हणून ओळखला जाऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर  एका प्रकरणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 सप्टेंबर रोजी थेट शिक्षण विभागातच धाड टाकलेली होती. यामध्ये दोन विस्तार अधिकारी सावन चालखुरे व लघुत्तम राठोड आणि सहायक  फुलझेले या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. यातील विस्तार अधिकारी सावन चालखुरे व लघुत्तम राठोड यांना जामिनावर सोडण्यात आले असून फुलझेले यांना सुद्धा नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे. या प्रकरणानंतर शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे या सुट्ट्या टाकून पसार झाल्या होत्या. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनीवर त्यांनी कधीच फोन उचलून या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. 

निकिता ठाकरे यांना नियमबाह्यरित्या प्रभारी शिक्षणाधिकारीच पद देण्यात आले असल्याची तक्रार सुद्धा शिक्षक परिषदे कडून करण्यात आलेली होती. शिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते. आता थेट शासनाचेच आदेश धडकल्यामुळे निकिता ठाकरे यांची उचलबांगडी करण्यात आली असून आता तरी नवीन शिक्षणाधिकारी या कार्यालयाला भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कार्याची हमी देतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...