खळबळजनक ; तीसगाव आश्रम शाळेमागे अनोळखी पुरुषाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले

खळबळजनक ; तीसगाव आश्रम शाळेमागे अनोळखी पुरुषाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले

आधुनिक केसरी न्यूज 

खुलताबाद : तालुक्यातील तीसगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळे मागे कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचे प्रेत दिसून आले. याची खबर पोलीस पाटील व मुख्याध्यापकाने पोलिस ठाण्यात दिल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
अंदाजे ४०-५० वयातील हिंदू पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आश्रम शाळेमागे आढळून आले. प्रेत अनोळखी असून मर्सिडीज बेंज लोगो, विटकरी रंगाचे टी शर्ट व राखी सारखे दोरा आदी वर्णन अंगावर असून प्रेत अनोळखी असल्याने पोलिस तपासात अडथळा निर्माण झाला आहे. कुणाचे ओळखीचे व माहिती असल्यास पोलिस निरीक्षक फराटे ९९२३४७४९९६, पोलिस ठाण्यासी संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रेत इसम कुठला, येथे मारुन आणून टाकले की येथेच खून केला? हे कारण अस्पष्ट असल्याने पोलिस तपासात अडथळा निर्माण झाला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...