लाडक्या बहिर्णीचे पैसे परस्पर उचलून केंद्रचालक फरार... 

लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाचा खात्यात... 

लाडक्या बहिर्णीचे पैसे परस्पर उचलून केंद्रचालक फरार... 

आधुनिक केसरी न्यूज 

सिध्दार्थ वाठोरे

हदगाव : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी चक्क पुरुष मंडळीच्या आधार कार्डाचा बापर करून जवळपास सव्वा तीन लाख रूपयांची रक्कम भावाच्या खात्यात पैसे जमा करून घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार हदगाव तालुक्यातील मनाठा येथे हा भयंकर प्रकार घडला असून, गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली योजना अल्पावधीतच कुचकामी ठरत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मनाठा येथील सीएससी केंद्र चालकाने, लाडक्या बहिणीचे अर्ज भरताना महिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषाचा आधार क्रमांक टाकला. काही दिवसानंतर रोजगार हमी योजनेतील विहिरीचे पैसे आले आहेत असे खोटे सांगून, ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक, अशी कागदपत्रे जमा केली. जेव्हा पैसे खात्यात जमा झाले, तेव्हा रोजगार हमीचे पैसे आहेत असे भासवून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली तीन लाख १९ हजार ५०० रुपये) परस्पर उचलून हडप केली आहे.
येथील रहिवासी अलीम सलीम कादरी यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचा संदेश आल्याने या घटनेचे बिंग फुटले. मनाठा गावातील ३८ तर बामणी फाट्यावरील ३३ भावांचा आधार कार्ड क्रमांक वापरून लाडक्या बहिणींचे ३ लाख १९ हजार ५०० रुपये परस्पर उचलून केंद्रचालक पसार झाला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...