नवरात्रोत्सव विशेष : संघर्षमय जीवनातून वाटचाल करणाऱ्या आदर्श शिक्षिका..!
सौ.शुभांगी मिसाळ यांच्यासाठी नवरात्रोत्सवाची दुसरी माळ
आधुनिक केसरी न्यूज
सौ.किशोरी शंकर पाटील
सौ.शुभांगी राजन मिसाळ यांच्या माहेरी दुधदुभत्याचा धंदा शेणगोटा, शेणी थापणे आईला घरकामात मदत हे सर्व करून जिद्दीने अभ्यास करून १०वी मॅट्रीक परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन डी.एड प्रवेश घेतला. १९८२ साली डी.एड पूर्ण झाले. १९८३ साली चिंचवड राजन मिसाळ यांच्याशी लग्न झालं. १९८४ साली पहिला मुलगा झाला. दरम्यान चुलत सासऱ्यांचे तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करीत होते. दुसऱ्या मुलीच्या वेळी शाळेत नोकरीसाठी बोलावणं आले, शाळेत रूजू झाल्यावर आठ दिवसांनी डिलीव्हरी झाली. तीन महिन्याच्या रजेनंतर शाळेत जाताना दोन्ही मुलांना शेजारील शिंदे काकू काळजी घ्यायच्या परंतु त्यांचेही कुटुंब होतं.
मुलगा अमित याला दोन वेळा टायफाईड झाला अॅडमीट करावं लागले. तेव्हा खूपच ओढाताण झाली. मिस्टरांनी नोकरी सोड म्हणून सांगितलं. तेव्हाही शिंदे काकू मदतीला धावून आल्या. सासू सासरे गांवी होते. मिस्टरांची नोकरी रात्र व दिवस पाळी असताना. मुलांची अबाळ होऊ नये म्हणून ते खूप काळजी घेत. त्यांचीही खूप मदत असे. पण शाळेच्या वारंवार बदल्या, जनगणना, मतदार याद्या सारखी कामे, शाळेतील इतर प्रोजेक्ट वगैरे यात अतिशय धावपळ व्हायची. शिकवण्याची आवड असल्याने वर्गाचा नेहमी रिझल्ट चांगला असायचा. विद्यार्थ्यां कडून पर्यावरण जागृती आणि इतर सामाजिक उपक्रमात सहभाग प्रत्येक शाळेत उत्तम कार्य तसेच स्काॅलरशीप परीक्षेत शाळेचा नेहमी १००टक्के रिझल्ट असे.ज्यादा तासिकेवर भर,गणित आणि बुध्दीमत्ता या विषयावर व्ययक्तिक मार्गदर्शन, शालेय पट १००% सामाजिक वनीकरणाची छोटी नाटुकलीचा स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि त्यावेळी बालचित्रवाणीत ही नाटुकली सादर झाली.पर्यावरण विषयक जागृतीचे नाट्यीकरण दूरदर्शनवर प्रशिक्षण प्रक्षेपित, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्कृष्ट श्रृतलेखनाची विद्यार्थ्यांना सवय लावली.
ज्ञानगंगा मासिकात मुलांना शिकवण्याच्या पध्दतीविषयी लेख प्रकाशित झाला. टाकाऊपासून टिकाऊ साहित्य बनवणे. विज्ञान प्रदर्शना सोबत सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचा सहभाग कृतीतून शिक्षणावर भर आपल्या घरच्या अडचणी व संघर्षमय जीवनातून वाटचाल करीत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिकवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. याचा परिपाक म्हणून २००८साली आदर्श शिक्षिका पुरस्कार चिंचवड महानगरपालिकेतून सत्कार करण्यात आला. मुलगा अमित आणि मुलगी अश्विनी उत्तम शिक्षण घेऊन लग्न झाली आहेत. नातवंडे पण शाळेत अतिशय हुशार आहेत.
Comment List