नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
परिचारिका मिना ठाकोर यांची नवरात्रोत्सवाची तिसरी माळ
आधुनिक केसरी न्यूज
लेखिका : सौ किशोरी शंकर पाटील
परिचारिका मिना ठाकोर यांचे जन्मगाव भोर आहे.तिथेच मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाले.गावात सरकारी दवाखाना होता, मात्र ओपीडी आणि डिलीव्हरी सिरियस पेशंटला पुण्यात न्यावे लागे. एसटीच्या प्रवासामुळे मॅट्रीक ला असतानाच ठरवले. पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा कोर्स करायचा. घरच्या विरोधाला न जुमानता जिद्दीने ३वर्षाचा नर्सिंग कोर्स पूर्ण केला, आणि परभणीला ३ वर्ष सरकारी दवाखान्यात नोकरी केली. लग्नानंतर मुबंईला हिंदूजा हाॅस्पीटलला प्रथम स्टाफ नंतर सिस्टर इनचार्ज म्हणून २२ वर्ष नोकरी केली. परिचारिका म्हटलं की चांगले वाईट अनुभव आले. त्यामुळे माणसं कळली. हाॅस्पीटल मधील एक मोठा अनुभव एकदा खेडेगावांतील बाई, रात्रीच्या वेळी बाळंतपणात वाॅर्ड मध्ये दाखल झाली. लघवी तुंबल्यामुळे वेदनेने कळवळत होती. रात्रपाळी होती डाॅक्टरांनी तपासून कॅथेटराझेशन करायला सांगितले. कॅथेटर लावण्याचा प्रयत्न केला.एपोझाॅटॅमीचे वर पर्यंत असल्याने त्याबाईची लघवी तुंबली होती.
टाके असल्याने कॅथेटर लावण्यासाठी त्रासदायक होत होते. स्वतःच्या जबाबदारीवर टाके कापून पुढील उपचार केला, म्हणजे कॅथेटराझेशन केले. त्यामुळे त्याबाईला आराम वाटला.यासाठी त्यांना बक्षीस दिले पण ते घेतले नाही. मिनाताईंचा तो एक कर्तव्याच्या भाग होता असे त्या नेहमी म्हणतात "रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा" त्यांचे खूप खूप कौतुक झाले. डाॅक्टर नंतर परिचारिका पेशंटची काळजी घेते. कोवीड मध्ये लाॅकडाऊन मध्ये डाॅक्टर, नर्स कोवीड विरुद्ध योध्दा बनून काम करीत होत्या. रात्रंदिवस घरापासून दूर राहून मनोभावे रूग्णांची काळजी घेत होत्या.मिनाताईसारख्या अशा अनेक परिचारकांना मनाचा मुजरा.
नर्स असल्यामुळे मुलं लहान असतांना मुलांच्या आजारपणात डाॅक्टराकडे धावपळ करावी लागली नाही. तरीही नोकरी करताना रात्रपाळी, दिवसपाळी सिरीयस पेशंट आला का धावपळ, घरी येवून मुलांचा सांभाळ करणे, त्यांचा अभ्यास परंतु आता दोन्ही मुलं उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करीत आहेत. सुना नातवंडांमध्ये रमल्या आहेत.मिनाताईंचा योगायोगाने साहित्य क्षेत्रात प्रवेश झाला.
सध्या आपल्या देशाच्या विविध भागांत नवरात्रोत्सव अगदी आनंदात आणि उल्हासात सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्त्री म्हणजे शक्तीची उपासना, नवरात्र स्त्रीमध्ये अशा शक्तीचा जागर. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार वर्षभर महिला विविध सणवार आहेत. हरितालिका, गौरीपूजन, दुर्गापूजन, लक्ष्मीपूजन आणि इतर सणवारही आहेत. अशा उत्सव व सणामध्ये स्त्रीला देवी म्हणून पुजले जाते. त्यामध्ये सण म्हणून बोलावणे, हळदी-कुंकू समारंभ, कुमारिका पूजन केले जाते. हे सारे परंपरा म्हणून केले जाते. त्यामागील गर्भितार्थ खाली जात नाही. स्त्रीचा शक्तीजागर, ही संकल्पना आपणही घडवून आणली पाहिजे,आणि ती अभ्यासली पाहिजे. प्रागतिक समाजातील लोक परंपरागत विचारसरणीला किंमत देतात. शक्तीना स्त्री शक्तीचा जागर कळला आहे, ही गोष्ट आहे. आजही ग्रामीण परिस्थिती दयनीय आहे. सैनिक सुशिक्षित आजही आत्याचाराला जावेत महिला स्त्रीचा सन्मान म्हणजे नारी शक्तीचा सन्मान. मनमनात जागर आत्मसात होत आहे.
Comment List