दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभेत सगळ्यात कमी तर,चिमूर मध्ये सर्वाधिक मतदान.
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा येत असून या सहा विधानसभेमध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आत्ता दुपारी एक वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारी मध्ये सगळ्यात कमी म्हणजे 29. 3% मतदान झाले असून चिमूर विधानसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 41.04 % मतदान झालेले आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांमध्ये अनुत्साह दिसून येत असून सकाळी सात ते नऊ यादरम्यान केवळ 4.78% मतदान झाले होते. तर 9 ते 11 या दरम्यान 17.63% मतदान झाले होते आणि दुपारी एक वाजता हातात आलेल्या आकडेवारीनुसार केवळ 29.3% इतके मतदान झाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मध्ये हे मतदान सगळ्यात कमी मतदान आहे. महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ असलेल्या बल्लारशा विधानसभेमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 35.41% मतदान झालेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात घेतलेल्या चिमूर येथील सभेनंतर मतदारांमध्ये उत्साह वाढलेला असून हाती आलेल्या आकडेवारीमध्ये 41.04% इतकं मतदान दुपारी एक वाजेपर्यंत चिमूर विधानसभेमध्ये झालेला आहे. सहाही विधानसभेमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये हे सगळ्यात जास्त मतदान आहे. तिरंगी लढत होत असलेल्या राजुरा मतदार संघामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत खेळ 37.22% मतदान झाले होते तर खासदार धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या वरोरा विधानसभेमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 32.24% मतदान झाले होते
Comment List