असामाजिक तत्वांकडून प्रशांत डिक्कर यांच्यावर जीवघेणा हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
जळगाव जा : स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करीता पहाटे शेगाव कडे येण्यास निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू झाली. धारधार शस्त्रांनी त्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून याचवेळी प्रशांत डिक्कर यांना हृदविकाराचा तीव्र झटका येऊन ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रशांत डिक्कर एक विस्थापित भूमिहीन शेतमजुराचा मुलगा असून तरून पणापासून शेतकरी चळवळीतील सक्रिय आहेत...आज संपूर्ण मतदारसंघाच प्रशांतभाऊची विजयाकडे वाटचाल सुरू असताना, असामाजिक तत्त्वांकडून प्रशांत भाऊ वर अशाप्रकारे हल्ला करून यांना काय साध्य करायचे आहे.विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे.अशाप्रकारे हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा हा कट करणाऱ्या लोकांनी एकप्रकारे लोकशाहीचा खून केला आहे.हल्ला करणारे हे कोण्या करोडपतीची औलाद नसेल ते तरी शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची मुले असतील.प्रशांत भाऊंनी याच शेतकरी मायबाप जनतेसाठी जीवच रान केलं.घरादाचा कधी विचार केला नाही.ज्याची म्हातारी माय आजही लोकांच्या शेतात रोजनदारिने कामाला जाते...प्रशांत भाऊचा फाटका संसार आज तुमच्या साठी उघड्यावर पडला.अरे, तुमच्या नाय हक्कासाठी ज्यांच रक्त या मातीवर सांडलं. त्या मातीशी इमान राखणाऱ्या या माणसावर तुम्ही भ्याड हल्ला केला. ही नियती तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
तुम्ही हल्ला करणारे कुण्या जातीचे आहात मला त्याचं मुळीच घेणं देणं नाही. पण तुम्ही एक माणूस आहात आणि या बुद्धाच्या देशात माणसाने माणसाशी प्रेमाने वागलं पाहिजे. माणूस म्हणून आपण त्याच्याशी माणसासारखे वागलं पाहिजे ही शिकवण बुद्धाचे आहे रे प्रशांत भाऊ सारख्या माणसावर हल्ला करून तुम्ही स्वतःला मर्द म्हणून घेत असाल, तर ही तुमचे चूक आहे मित्रा. ज्याचं काळीज वाघाच आहे. ज्याच्या शिरावर इथल्या गोरगरीब कष्टकरी,आदिवासी बांधवाचा आशीर्वाद आहे. या वाघाच्या बछड्याची शिकार करायला तुम्ही निघालात. आज तुम्ही षंढ ठरलात. मागून वार करणं ही आपली संस्कृती नाही मित्रा प्रशांत भाऊ या मतदार संघातील लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत प्रशांत भाऊ इथल्या गोरगरीब लोकांचा आधार आहे. प्रशांत भाऊ इथल्या आदिवासींसाठी उजेडाचा सूर्य आहे. प्रशांत भाऊ इथल्या माय बहिणींसाठी मायेच्या ओलाव्याचं आंगन आहे. प्रशांत भाऊ इथल्या तरुणांसाठी स्फूर्ती स्थान आणि प्रेरणास्थान आहे. प्रशांत भाऊ म्हणजे उजेडाचा लख्ख प्रकाश प्रकाशाचा सूर्य काळ्याकुट्ट ढगांनी आणि रात्रीच्या काळोखाने कितीही गडद अंधार पसरवेला तरीही क्रांतीचा आणि समतेचा उजेड दाही दिशा पसरवणाऱ्या प्रशांत भाऊ सारख्या सूर्याची सकाळची कोळी किरण अंगा खांद्यावर घेत हा समाज प्रशांत भाऊला डोक्यावर घेऊन नाचत्या शिवाय राहणार नाही....
Comment List