'या' जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान..!

'या' जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान..!

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.20) चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 64.48 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता आहे.
70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 7 हजार 344 पुरुष मतदार, 1 लक्ष 6 हजार 12 स्त्री मतदार व 2 इतर मतदार अशा एकूण 2 लक्ष 13 हजार 358 मतदारांनी (65.59 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 296 पुरुष मतदार, 98 हजार 4 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 300 मतदारांनी (53.57 टक्के) मतदान केले. 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 98 हजार 179 पुरुष मतदार, 99 हजार 989 स्त्री मतदार व 3 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 98 हजार 171 मतदारांनी (63.44 टक्के) मतदान केले.
73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 97 हजार 592 पुरुष मतदार, 1 लक्ष 3 हजार 573 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 1 हजार 165 मतदारांनी (72.97 टक्के) मतदान केले.
74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 431 पुरुष मतदार, 1 लक्ष 7 हजार 697 स्त्री अशा एकूण 2 लक्ष 10 हजार 128 मतदारांनी (74.82 टक्के) मतदान केले.तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात 84 हजार 825 पुरुष मतदार, 84 हजार 991 स्त्री मतदार व 1 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 69 हजार 817 मतदारांनी (60.21 टक्के) सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लक्ष 92 हजार 667 पुरुष मतदारांनी, 6 लक्ष 266 स्त्री मतदारांनी आणि 6 इतर मतदारांनी अशा एकूण 11 लक्ष 92 हजार 939 मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले. जिल्ह्याची मतदानाची सरासरी टक्केवारी 64.48 आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि. २१/११/२०२४ विधानसभा निवडणुकीतील चंद्रपूर जिल्ह्याची अंतिम आकडेवारी नुकतीच हाती आली असून या आकडेवारीनुसार चंद्रपूर...
'या' जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान..!
चंद्रपूरात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झालेली आकडेवारी बघाच
बल्लारशा विधानसभेत तणाव; काँग्रेसचे स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार पोलिसांच्या ताब्यात..!
दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभेत सगळ्यात कमी तर,चिमूर मध्ये सर्वाधिक मतदान.
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
त्या माय माउलीच्या रुपाने मिळाला अम्माचा आर्शिवाद