ना.मुनगंटीवार यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न दुर्देवी..!
आधुनिक केसरी न्यूज
बल्लारपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून जो नेता बल्लारपूरचे यशस्वी नेतृत्व करतोय. ज्याच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. सुसंस्कृत, सभ्य आणि एक अभ्यासू नेता म्हणून ज्या नेत्याची महाराष्ट्रात ओळख आहे… अशा सुधीर मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत दुर्देवी आणि काँग्रेसच्या वैचारिक दारिद्र्याचे लक्षण आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. बल्लारपूरचे काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्यासमक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांना केलेल्या धक्काबुक्कीच्या प्रयत्नांचा संपूर्ण मतदारसंघातून निषेध व्यक्त होत आहे. संतोष रावत व त्यांच्या कार्यकर्त्यांची ही वागणूक म्हणजे 'विनाशकाले विपरित बुद्धी' आहे. निवडून येण्यापूर्वीच अशा गुंड प्रवृत्तीचे प्रदर्शन काँग्रेसकडून होत असेल तर निवडून आल्यावर किती उपद्रव माजवला जाईल, याची कल्पना करून मतदारांनी त्यांना धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.
मुल तालुक्यातील कोसंबी येथे गावातील लोकांची नलेश्वर तलावाच्या विषयावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नागरिकांशी चर्चा करत होते. त्याचवेळी तेथे काँग्रेसचे संतोष रावत कार्यकर्त्यांसोबत पोहोचले. आणि उपस्थितांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अश्याही परिस्थितित शत्रूचेही आनंदाने स्वागत करण्याचे संस्कार ज्यांच्यावर आहेत असे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी संतोष रावत सोबत अत्यंत नम्रपणे संवाद साधला. ‘मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे चर्चा करतोय. माझी चर्चा झाल्यानंतर तुम्हालाही चर्चा करण्याचा अधिकार आहे,’ असं त्यांनी अतिशय नम्रपणे रावत यांना सांगितलं.
रावत यांच्याप्रमाणेच त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्तेही गुंड प्रवृत्तीचे त्यामुळे त्यांनी मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. किमान ते महाराष्ट्राचे जेष्ठ नेते,मंत्री आहेत, याचेही भान त्यांना राहीले नाही. मात्र सुरक्षारक्षकांनी रावत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा डाव हाणून पाडला.
संतोष रावत यांची वृत्ती गुंडप्रवृत्तीची आहे, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत. ना.मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्याच्या बाबतीत आजवरच्या इतिहासात असे कधीही घडले नाही. पण रावतसारखा उपद्रवी, गुंडप्रवृत्तीचा उमेदवार काँग्रेसकडून उभा असल्याने हा प्रकार घडला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.
बहिणींनीच दिला चोप
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी उपस्थितांसोबत हुज्जत घातली. महिलांना अपशब्द वापरल्यावर लाडक्या बहिणींनीच चोप दिला.काँग्रेसचे विजय चिमड्यालवार व राकेश रत्नावार यांना ग्रामस्थ महिलांनी चांगले बदडून काढले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांचा चष्माही या झटापटीत फुटल्याची माहिती आहे.
Comment List