०८ नोव्हेंबरला निघणार ७५० भक्तांची दिव्य संकल्प स्पेशल रेल्वे यात्रा

०८ नोव्हेंबरला निघणार ७५० भक्तांची दिव्य संकल्प स्पेशल रेल्वे यात्रा

आधुनिक केसरी न्यूज 

 राधेश्याम चांडक

बुलडाणा : सद्भावना सेवा समितीद्वारा आयोजित दिव्य संकल्प रेल्वे यात्रा दि. ०८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत १० दिवसांची स्पेशल रेल्वे यात्रा आयोजित केली आहे. विदर्भ मीरा संत सुश्री अलकाश्रीजी सकाळी ९ वाजता रेल्वेचे पुजन करुन सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक स्पेशल रेल्वेला सुरू करण्यासाठी झेंडी दाखवितील अकोला येथुन शुक्रवारी सकाळी ९ वाजता मथुरेसाठी प्रस्थापन ९ तारखेला सकाळी मथुरेला आगमन, लगेचच स्पेशल बसेस द्वारा वृंदावनला प्रस्थान, दर्शन, भ्रमण, रात्री विश्राम, १० नोव्हेंबरला सकाळी मथुरेला आगमन दिवसभर दर्शन व भ्रमण करुन रात्री ९ वाजता अयोध्याला प्रस्थान, ११ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता अयोध्या आगमन शरयु स्नान करुन राम जन्मभुमी, हनुमान गढी दर्शन, रात्री विश्राम, दि. १२ ला सकाळी नंदीग्रामला रवाना, दुपारी ३ वाजता सुंदरकांड पठण, रात्री १० वाजता वाराणसीसाठी प्रस्थान, दि. १३ ला सकाळी ५ वाजता वाराणसी आगमन, काशिविश्वनाथ मंदिर, गंगा आरती करुन रात्री ९ वाजता व गंगासागरसाठी हावडा ला रवाना, दि. १४ ला सकाळी ९ वाजता हावडा आगमन व स्पेशल बसेस, स्टीमर द्वारा गंगासागरला रवाना, दर्शन व रात्री विश्राम, दि. १५ ला साईट सीन व दर्शन करुन बसेस द्वारा हावडा, काकद्विपला प्रस्थान, काली मंदिर दर्शन करुन रात्री ९ वाजता जगन्नाथपुरीसाठी प्रस्थान, दि. १६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता पुरीला आगमन, जगन्नाथ मंदिर दर्शन करुन समुद्र किनारा साईट सीन पाहुन रात्री ८ वाजता अकोलासाठी प्रस्थान, दि. १७ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता अकोला येथे आगमन व यात्रेचे समापन होईल.

चहा, नाश्ता, दोन वेळचे भोजन, कार्तीक एकादशीला फराळाची व्यवस्था ट्रेनमध्ये व निवासस्थानी होईल. समितीकडुन सर्व व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वानी यासाठी जे सहकार्य केले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत असे भावपुर्ण उद्‌गार भाईजी यांनी काढले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज,९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या ;पो लीसांचा चोख बंदोबस्त..! मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज,९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या ;पो लीसांचा चोख बंदोबस्त..!
आधुनिक केसरी न्यूज  जळगाव जा : जळगाव जामोद विधानसभेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून ९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला...
चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान
'या' जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान..!
चंद्रपूरात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झालेली आकडेवारी बघाच
बल्लारशा विधानसभेत तणाव; काँग्रेसचे स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार पोलिसांच्या ताब्यात..!
दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभेत सगळ्यात कमी तर,चिमूर मध्ये सर्वाधिक मतदान.
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान