प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने विजय वडेट्टीवार यांचे नामनिर्देशन पत्र दाखल

प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने विजय वडेट्टीवार यांचे नामनिर्देशन पत्र दाखल

आधुनिक केसरी न्यूज 

ब्रह्मपुरी : दि.२८  महाराष्ट्रद्रोही भाजपने सत्तेसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीला  बदनाम केले. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मिती कार्यातही कमिशनखोरी केली. त्यामुळे या महापापी, सत्तापिपासू सत्ताधाऱ्यांना  त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण सर्वांनी लढलं पाहिजे. ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची असून  या लढाईत प्रत्येकाने योगदान देत वडेट्टीवार साहेबांना विक्रमी मतांनी विजयी  करण्याचा संकल्प करावा, असे  आवाहन छत्तीसगड राज्याचे  माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलं.  याप्रसंगी ब्रम्हपुरी येथे आयोजित सभेत श्री. बघेल बोलत होते. 

श्री. बघेल म्हणाले की, महाराष्ट्रातील काही भाजपवाल्यांनी सत्ता प्राप्तीसाठी आमदारांचा बाजार भरवला. खोके देऊन त्यांची खरेदी केली. इथले उद्योग गुजरातला गेले. प्रचंड बेरोजगारी व महागाईचा जनतेला सामना करावा लागत आहे. हे महायुतीचे मोठे पाप आहे. संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे  सुपुत्र विजय वडेट्टीवार यांनी विरोधी बाकावर बसून किल्ला लढविला. या महाराष्ट्राने लोकसभेत मोदींना पराभवाची धूळ चारून ट्रेलर दाखविला आहे. आगामी विधानसभेत या महायुतीला संपूर्ण पिक्चर दाखवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सामान्यांची वेदना जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी आजवरची कारकीर्द समर्पित केली. आज विजयकिरण फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथम स्तरावरील कर्करोग निदान करणाऱ्या फिरत्या दवाखान्यातून हजारो रुग्णांचे प्राण वाचविले. रस्ते, विज व शेतीसाठी मुबलक पाणी यासह इतर अनेक लोकोपयोगी कार्य केले. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने मला प्रेम दिले. यापुढेही आपले प्रेम आशीर्वाद मिळत राहील. 

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेत ज्या पद्धतीने आपण संविधान वाचवण्यासाठी भरभरून साथ दिली अगदी त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेतही महाविकास आघाडीला साथ द्या. जनसमस्यांचे समूळ निराकरण करण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी आपण जनसेवेची पुन्हा एकदा मला संधी द्या. या संधीच सोन करून दाखवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विजयाच्या हॅट्रिकसाठी  ब्रह्मपुरी तयार असल्याचे सूतोवाच यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी केले.

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढून नामांकन दाखल करण्यात आले. यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रांतील सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी टाक्यातील हजारोंचा संख्येने जनसमुदायाने हजेरी लावली होती. नामांकनाची सभा, महारॅली ठरली अभूतपूर्व ठरली.

यावेळी गडचिरोली - चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान, काँग्रेसचे ओझा, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार,बल्लारपूर - मुल विधानसभा क्षेत्र उमेदवार संतोषसिंह रावत, ॲड, राम मेश्राम, संदिप गड्डमवार, प्राचार्य जगनाडे, खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकार,डॉ.राजेश कांबळे,विलास विखार,दिनेश चिटनुरवार, प्रमोद चिमूरकर, रमाकांत लोधे, नितिन गोहने, आदिवासीं नेते अवचितराव सयाम, ॲड. गोविंद भेंडारकर, धीरज शेडमाके, यशवंत दिघोरे, तसेच महिला आघाडी, युवक काँग्रेस, तर  एनएसयुआय, तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड
रिसोड: देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटनेच्या रिसोड तालुका कार्यकारिणीची आढावा सभा  आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी व्हॉईस ऑफ मीडिया...
कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात 
CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद.
माजी मुख्यमंत्री कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे.
काँग्रेस कार्यालयावर भाजपचा भ्याड हल्ला, बहुमताच्या जोरावर ही मस्ती चालणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!