माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना उबाठा मधुन हकालपट्टी... 

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना उबाठा मधुन हकालपट्टी... 

आधुनिक केसरी न्यूज 

सिध्दार्थ वाठोरे

हदगाव : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शिवसेनेने आज दि ९ रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

सुभाष वानखेडे यांनी हदगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दाखवून पक्षाकडे तिकिटाची विनंती केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सुभाष वानखेडे यांनी ठाकरे गटावर  उमेदवारी विकल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी झाली.
शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
शिवसेनेचे तीन वेळा आमदार असलेले सुभाषराव वानखेडे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०१९ ची लोकसभा निवडणूक हिंगोलीतून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली, तरीही त्यांचा पराभव झाला. शिवसेना फुटल्यानंतर वानखेडे ठाकरे गटात सामील झाले होते.


चौकट..... 


शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असो किंवा पद असो जिल्हा तालुकाप्रमुख पदी निवड आसो पैशाचा व्यवहार करून पदे दिले जातात हाच प्रश्न त्यांना मी विचारला होता हे जे चाललंय ते चुकीचा आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते गेले विस विस वर्षे काम करत आहेत पक्ष वाढीसाठी काम करत आहेत अशा कार्यकर्त्याला उमेदवारी न देता अवघ्या पाच तासात बाहेरचा उमेदवार आणायचा आणि त्याला उमेदवारी द्यायची निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलायचा हा प्रश्न त्यांना विचारल्याने माझी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

माजी खासदार सुभाष वानखेडे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थी त्रस्त पेपर रद्द..! गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थी त्रस्त पेपर रद्द..!
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाद्वारे हिवाळी 2024 च्या परीक्षा सुरू आहेत. डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून सर्वत्र मिरवणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या...
गोंडवाना विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकाला ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ पुरस्कार
संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भागात स्वातीताईना प्रचंड प्रतिसाद..!
डाॅ.संजय कुटे यांच्या प्रचारार्थ मोठे बंधू राजुभाऊ कुटे यांचा गावभेटी दौरा..!
जागृती जथ्याच्या माध्यमातून मतदार संघात संजू भाऊचा प्रचार धूम धडाक्यात सूरू
अखेर अभिलाषा गावतुरे यांची हकालपट्टी..!
प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद येथे संभाजी राजे यांची जाहीर सभा