शिरसमाळ, केसापुरी तांड्याला समस्यामुक्त करणार : राजू शिंदे 

शिरसमाळ, केसापूरी तांड्यावर मतदारांचा उत्साह 

शिरसमाळ, केसापुरी तांड्याला समस्यामुक्त करणार : राजू शिंदे 

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजी नगर : शिरसमाळ तांडा डोंगर, दऱ्या अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटंसं गाव आहे. गाव वनराज्जिने नटले आहे. पण गावात प्रवेश करताच दोन्ही तांड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवला. या समस्या सोडविण्यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न करील. तुम्ही मला साथ द्या, मी विकासाला हाक देतो, असा विश्र्वास व्यक्त करून मशाल चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन महा विकास आघाडीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजू भाऊ शिंदे यांनी केले. 
ते शिरसमाळ व केसापूरी तांडा येथे प्रचारार्थ आले असता नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. त्यावेळी रविभाऊ चव्हाण, लहू चव्हाण, रमेश राठोड, वन सिंग चव्हाण, सुभाष चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने राजू भाऊ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमानगर शहर जिल्हाध्यक्ष नगर विभाग  साहेबराव बनकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष सर्जेराव चव्हाण पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट) मुकेश राठोड, शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख बिरजू भैया, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन राठोड,  शिवसेना विभाग प्रमुख राजू चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थी त्रस्त पेपर रद्द..! गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थी त्रस्त पेपर रद्द..!
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाद्वारे हिवाळी 2024 च्या परीक्षा सुरू आहेत. डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून सर्वत्र मिरवणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या...
गोंडवाना विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकाला ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ पुरस्कार
संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भागात स्वातीताईना प्रचंड प्रतिसाद..!
डाॅ.संजय कुटे यांच्या प्रचारार्थ मोठे बंधू राजुभाऊ कुटे यांचा गावभेटी दौरा..!
जागृती जथ्याच्या माध्यमातून मतदार संघात संजू भाऊचा प्रचार धूम धडाक्यात सूरू
अखेर अभिलाषा गावतुरे यांची हकालपट्टी..!
प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद येथे संभाजी राजे यांची जाहीर सभा