अखेर अभिलाषा गावतुरे यांची हकालपट्टी..!

अखेर अभिलाषा गावतुरे यांची हकालपट्टी..!

आधुनिक केसरी न्यूज

बल्लारशा : विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने हकालपट्टी करत पुढील सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात आलेले आहे.महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनिथला यांच्या आदेशावरून व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून ही हकालपट्टी करण्यात आली असून यात  बंडखोरी करून लढणारे चंद्रपूर मधील राजू झोडे यांचाही या यादीत समावेश आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 16 जणांवर काँग्रेस पक्षातर्फे कारवाई करण्यात आली असून पुढील सहा वर्षाकरिता या 16 जणांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात आले आहे.डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यानंतर पक्षातर्फे त्यांना मनवण्यात आले नाही किंवा उमेदवारी मागे घेण्याकरिता पक्षातर्फे कोणाकडून साधा फोनही आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या उमेदवारीला नाना पटोले यांचा आशीर्वाद तर नाही ना अशी कुजबूज संपूर्ण मतदारसंघांमध्ये सुरू झाली होती प्रतिभाताई धानोरकर यांच्या कडून गावतुरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न झाले होते हे विशेष.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि. २१/११/२०२४ विधानसभा निवडणुकीतील चंद्रपूर जिल्ह्याची अंतिम आकडेवारी नुकतीच हाती आली असून या आकडेवारीनुसार चंद्रपूर...
'या' जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान..!
चंद्रपूरात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झालेली आकडेवारी बघाच
बल्लारशा विधानसभेत तणाव; काँग्रेसचे स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार पोलिसांच्या ताब्यात..!
दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभेत सगळ्यात कमी तर,चिमूर मध्ये सर्वाधिक मतदान.
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
त्या माय माउलीच्या रुपाने मिळाला अम्माचा आर्शिवाद