घराघरात मशाल पोहचवा - विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
प्रत्येक बूथवर मताधिक्य मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे : महाविकास आघाडीचे उमेदवार राजू भाऊ शिंदे यांचे आवाहन ; पदमपुरा येथिल कुमावत मंगल कार्यालयात महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजी नगर - आपला विजय पक्का आहे. कारण, यांना जनता कदरली आहे. गेली 15 वर्ष त्यांनी या मतदार संघावर राज्य केले. मागच्या वेळी मी अपक्ष उमेदवार म्हणून लढलो. त्यांना घाम फोडला. आता माझ्याकडे मशाल चिन्ह आहे. आपला विजय जरी पक्का असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक बूथवर मताधिक्य मिळविण्यासाठी कशोशिने प्रयत्न करावे, असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना महा विकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी केले.
ते पदमपुरा येथिल कुमावत मंगल कार्यालयात पार पडलेल्या महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना जिल्हा प्रमुख माजी महापौर त्रिंबक तुपे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, माजी जिल्हा प्रमुख सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे श्री हिवाळे, महिला आघाडीच्या सुनीता बरतूने, माजी महापौर नंदू घोडेले आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उमेदवार राजू शिंदे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी जिथं त्यांचा जन्म झाला तिथला विकास झाला नाही. तो काय विकास करणार, असा निशाणा साधून मी या मतदार संघाचा कायापालट करेल, असा विश्र्वास व्यक्त केला. बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा हा प्रभाग आहे. त्यांनी त्यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यामुळे शिव सैनिक त्यांना कदापि माफ करणार नाही. पश्चिम विधानसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हात आपले नातेवाई असतील, मित्र असतील त्या ठिकाणी आपल्याला जाऊन, वाड्यावरती बूथ वरती जाऊन आपल्या हक्काचे मतदान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रकाश कमलानी, नितीन पवार, काँग्रेसचे हरिभाऊ, महेंद्र रमणवार, सचिन तायडे, राजेन्द्र कुंडळवर , सतीश कुंडलवर,
कुमावत समाजाचे अध्यक्ष राजेन्द्र कुमावत, प्रमोद चोपडा, दिलीप झुरणवाल आदींसह युवक आघाडी, महिला आघाडी आदींची उपस्थिती होती.
-----
घराघरात मशाल पोहचवा - विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
- एका बूथ वर 100 मतांचे आधिक्य मिळावे, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. बन्सीलाल नगर, पदमपूरा बूथ, कोकणवाडी, वेदांत नगर आदी ठिकाणी सशक्त पदाधिकारी आहेत. कोणाला घाबरायचे कारण नाही. आपले काम नीट करा. विजय पक्का आपलाच आहे. आपल्या पारड्यात जास्त मत कशी पडतील यासाठी व्युव्हरचना आखावी, असे सांगण्यात आले. यावेळी युवासेना, महिला आघाडी यांना जबाबदारी देण्यात आली.
भारत बरथूने 8 वार्ड प्रचार प्रमुख तथा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सचिन जीवनवाल, लालावर बर, विजय कुमावत, अनिल जीवनवाल, सागर बारवाल, स्वप्निल सांबरवार, प्रवीण फुलवाडे, रवी रेड्डी, रवी रमणवार,
निरीक्षक रवी गायकवाड, विजू वाघमारे आदींनी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करावे.
Comment List