आदिवासी भागातील जनसंवाद दौऱ्याला डॉक्टर संजय कुटे यांना भरभरून प्रतिसाद..!

आदिवासी भागातील जनसंवाद दौऱ्याला डॉक्टर संजय कुटे यांना भरभरून प्रतिसाद..!

आधुनिक केसरी न्यूज 

सागर झनके 
जळगाव जा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागात  महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांच्या संवाद दौऱ्याला उमापूर,चारबन,गारपेठ या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतीसाद मिळत आहे. जलसंवाद दौऱ्यानिमित्त आदिवासी बांधवांसोबत संवाद साधताना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सांगितले की, आम्ही आदिवासी बांधवांच्या नेहमी सोबत असून त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे. ह्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. हा आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून हा आदिवासी बांधव आमच्या सोबत जोडलेला असून या निवडणुकीत सुद्धा हा सर्व आदिवासी समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे या निवडणुकीत विजयापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आदिवासी गावातील प्रत्येक गावात त डॉक्टर संजय कुटे यांचे  आदिवासी महिलांनी ओवाळून औक्षण केले. प्रत्येक गावात त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव व महिला एकत्र झाल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.या जनसंवाद दौऱ्याच्या प्रचारात महायुतीतील सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाचखोर सरपंच व माजी सरपंच 'एवढ्या' लाखाची लाच घेतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात  लाचखोर सरपंच व माजी सरपंच 'एवढ्या' लाखाची लाच घेतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात 
आधुनिक केसरी न्यूज  धुळे : तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र...
पैठणमध्ये एस.टी.भाडेवाडीविरोधात शिवसेनेच्या वतीने चक्का जाम....
देशभक्ती कृतीतून व्यक्त करा : आ.किशोर जोरगेवार
अशोक सराफ यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ; निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया म्हणाल्या..!
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
गायरान पट्टे नावावर करण्यासाठी सुजलेगाव येथील नागरिकांचे नायगाव तहसील समोर उपोषण सुरू
सायंकाळी सात वाजता पालकमंत्री डॉ.प्रा.अशोक उईके यांचा सत्कार सोहळा