छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास येत आहे, येथील औद्योगिक ईकोसिस्टिम अतिशय व्हायब्रंट असून, येथील उद्योग संघटना, स्टार्टअप इंक्युबेटर यांचे मोठे योगदान आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारीमधून साकारलेल्या प्रकल्पांचा पॅटर्न संपूर्ण देशात राबविला पाहिजे असे मत देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) संरक्षण रिसर्च आणि डेव्हलोपमेंट विभागाचे सचिव (DDR&D) आणि डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी व्यक्त केले ते मॅजिकतर्फे आयोजित छत्रपती शाहू इंजिनियरिंग कॉलेज येथे डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत सध्या उत्पादन क्षेत्रात १६% हिस्सा आहे. हा हिस्सा २४-२५% वर नेणे आवश्यक आहे. डीआरडीओ, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांनी एकत्र येऊन आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. संरक्षण क्षेत्रामध्ये २०१४ नंतर काही अमुलाग्र बदल झाले, आपण आत्मनिर्भरतेकडे लक्ष दिले. सुरक्षित देश असेल तर तेथील अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. भारतात संशोधन आणि विकासावर आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 0.68% इतका खर्च केला जातो आणि आणि हे पण बहुसंख्य सरकारच्या पुढाकारतून आहे, हे प्रमाण 1 टक्क्याच्या वर गेला पाहिजे, यासाठी खाजगी क्षेत्राने देखील पुढे आले पाहिजे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासावर 5.6% खर्च केले जाते हे प्रमाणही वाढवता येऊ शकते, असे ये म्हणाले
डॉ. कामत म्हणाले की, जग एका ध्रुवीय ते बहु-ध्रुवीय जागतिक व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण परिवर्तनावर प्रकाश टाकून केली, ज्यामध्ये तांत्रिक बदलांचा वेग वाढतो आणि युद्धाचे स्वरूप बदलत असलेल्या विघटनकारी तंत्रज्ञानाचा उदय होतो. डॉ. कामत यांनी भर दिला की, भारत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपवर प्रभाव टाकण्यासाठी धोरणात्मक स्थितीत आहे, त्यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रचलित उत्पादन निर्मितीसाठी मोठ्या संस्था कार्यान्वित असल्या तरी, संरक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्यासाठी स्टार्टअप ईकोसिस्टिम पुढे आली पाहिजे. येथे मॅजिक सारखी इंक्युबेशन संस्था महत्वाची भूमिका निभावत असल्याचे त्यांनी नमूद केले. युद्ध करण्याचा विस्तार आता पारंपारिक जमीन, समुद्र आणि हवा पासून आता सायबर, अंतराळ तसेच माहिती समाविष्ट करणार्या नेटवर्किंग मध्ये झाला आहे. तंत्राद्यानात झालेले हे बदल आत्मसात करून नाविन्यपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
: 2047 पर्यन्त भारत डिफेंस निर्यातीत जगात एक नंबरवर राहील*
आत्मनिर्भर भारत संकलपणेला चालना देतांना संरक्षण क्षेत्रात देखील भारतीय बनवतीचे उत्पादन होत आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश आयतीवर अवलंबून असणारे हे क्षेत्र यावर्षी 90% निर्माण होणारे उत्पादन भारतीय आहे, आणि केवळ 10% बाहेरील देशातून आयात होत असल्याचे त्यांनी संगितले. यावर्षी भारतातून संरक्षण क्षेत्रातिल निर्यात 20000 कोटी रुपये होती, जी 2037 पर्यन्त 1 लाख कोटी पर्यन्त जाईल. 2047 पर्यन्त भारत संरक्षण क्षेत्रात जगातील सर्वाधिक निर्यात करणारा देश म्हणून नावारूपास येईल, असे त्यांनी संगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मॅजिकचे संचालक आशीष गर्दे यांनी मॅजिक च्या माध्यमातून घेण्यात येणार्या इनोव्हेशन चॅलेंज बद्दल माहिती. मॅजिक संचालक रितेश मिश्रा यांनी मॅजिकच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या प्रकल्पांची माहिती सांगणारे सादरीकरण केले.
डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024’ ही स्पर्धा संरक्षण क्षेत्रातील समस्यांवर उपाय देणार्या या विषयाला घेऊन काम करणाऱ्या विकासाभिमुख, रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि राष्ट्रासाठी बौद्धिक संपदा निर्मितीमध्ये योगदान देण्याची क्षमता असलेल्या नाविन्यपूर्ण विद्यार्थी, इनोव्हेटर्स, स्टार्टअप्संना प्रोत्साहन देणार आहे, अशी माहिती या वर्षीची ‘डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024’ स्पर्धेचे निमंत्रक आणि संस्थेचे संचालक प्रसाद कोकीळ यांनी दिली. संरक्षण क्षेत्रातील प्रामुख्याने भेडसावणार्या पण कधी निराकरण न झालेल्या समस्यांची उकल करण्याच्या दृष्टीने यावर्षीच्या चॅलेंज आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी सीआयआय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आणि बागला ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी कुमार बागला, डीआरडीओ अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज, आणि सीएमआयए अध्यक्ष अर्पित सावे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद कंक, मॅजिक संचालक आणि अध्यक्ष मराठवाडा ऑटो क्लस्टर, आशीष गर्दे, संचालक मॅजिक, प्रसाद कोकिळ, संचालक मॅजिक, रितेश मिश्रा, संचालक मॅजिक, डॉ. श्रीकांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी, सीएसएमएसएस, डॉ. उल्हास शिंदे, प्राचार्य छत्रपती शाहू इंजिनियरिंग महाविद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅजिकच्या प्रीती कामठे यांनी केले. . मिलिंद कंक यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शशिकांत तिवारी, राघवेंद्र कुलकर्णी, कृष्ण टेकाळे, गौरव बाठिया, मकरंद भालेराव, मोहम्मद अरखम मोहिउद्दीन, छत्रपती शाहू इंजिनियरिंग महाविद्यालयाचे एस. बी. कुलकर्णी आणि डॉ. मनोज माटे यांनी कष्ट घेतले.
*डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024*
या स्पर्धेमध्ये आयडिया स्टेज, प्रोटोटाईप आणि महसूल टप्प्यांवरील स्टार्टअपसाठी स्वतंत्र मूल्यमापन आणि पुरस्कार आहेत. या स्पर्धेकरिता एकत्रित पुरस्काराचे मूल्य ~6.5 लाख रुपये असून या सोबत मॅजिक संस्थेमध्ये इनक्युबेशन सपोर्ट देण्यात येणार आहे. मॅजिकच्या डाईस2024 (DICE2024) उपक्रमाकरिता 3D इंजिनिअरिंग या सर्वात वेगाने वाढणाऱ्या अभियांत्रिकी उत्पादन कंपनी असलेल्या संस्थेचे सहकार्य लाभले आहे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, आयडेक्स, स्टार्टअप इंडिया आणि पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार या विभागाचे पाठबळ मिळाले असल्याची माहिती मॅजिकच्या वतीने देण्यात आली आहे.
अखिल भारतीय स्तरावर आयोजित या स्पर्धकरिता कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीची अट नाही तसेच सर्व वयोगट आणि क्षेत्रांतील नवोदितांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेत अर्ज सादर करण्यासाठी, bit.ly/MAGIC_DICE या संकेतस्थळाला भेट द्यावी; ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख गुरुवार, 31 ऑक्टोबर 2024 असून या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी contact@magicincubation.com वर संपर्क साधू शकतात, अशी माहिती मॅजिकच्या वतीने देण्यात आली आहे.
Comment List