डॉ. खत्री महाविद्यालय चंद्रपूर हे विद्यापीठात उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या ११ व्या व १२ व्या दिक्षांत समारंभ व तेराव्या वर्धापन दिनी डॉ. खत्री महाविद्यालय तुकुम, चंद्रपूरला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. मिलींद बाराहाते, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मा. प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, मा. कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापक मंडळचे सर्व पदाधिकारी, सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव डॉ. सुशील कपूर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे एम. काकडे यांना उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. एन. एच. खत्री सर, संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. अनुश्री पाराशर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार आपणा सर्वांचा योगदानातून महाविद्यालयाला प्राप्त झालेला आहे. अशी प्रतिक्रीया संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. नंदकिशोर खत्री यांनी दिली व सर्वांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Comment List