खुशखबर....'लाडकी बहीण' योजनेचा तिसरा टप्पा ; 'या' भगिनींना मिळतोय लाभ!
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला सुरुवात झाली आहे. अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री श्रीमती आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
25 सप्टेंबर रोजी 34 लाख 34 हजार 388 भगिनींना एकूण 1545 कोटी 47 लाख रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले असून 26 सप्टेंबर रोजी 38 लाख 98 हजार 705 भगिनींना 584.8 कोटी रुपये आणि 29 सप्टेंबर रोजी 34 लाख 74 हजार 116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.
उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून महिला व बालविकास विभाग यासाठी दिवस रात्र कार्यरत आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे.
ज्या महिलांना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकसोबत देण्यात आले आहेत. या योजनेद्वारे महिलांच्या सक्षमीकरणास मोठा हातभार लागेल, याची खात्री आम्हाला आहे असे मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
.....
Comment List