जायकवाडी धरण  100 टक्के भरले ;  दुसर्‍यांदा उघडले १८ दरवाजे 

जायकवाडी धरण  100 टक्के भरले ;  दुसर्‍यांदा उघडले १८ दरवाजे 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : 1522 फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी या धरणात आज 1521.90 फूट पाणी पातळीची नोंद झाली. 99.80 टक्के पाणीसाठा असताना वरील भागातील   पाणी  दाखल होत असल्याने  धरणाचे दरवाजे उघडण्याचा बुधवार दि,२५ रोजी १०: वा  दुसर्यानंदा  निर्णय घेतला.
 जायकवाडी धरण १०० टक्के भरले असून जलाशयामध्ये सध्या ४ हजार १६९ क्युसेक  पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नाथसागर प्रकल्पाचे 27 पैकी १८ दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रामध्ये ९ हजार ४३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.
पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे अवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान