मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाचे आंदोलन; राजुर कडकडीत बंद; आंदोलकांची पायी रॅली, व्यापाऱ्यांचे सहकार्य 

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाचे आंदोलन; राजुर कडकडीत बंद; आंदोलकांची पायी रॅली, व्यापाऱ्यांचे सहकार्य 

आधुनिक केसरी न्यूज 

प्रा.बाबासाहेब बोराडे 

श्रीक्षेत्र राजुर : मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण मिळावे म्हणून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे म्हणून भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.वैद्यकीय सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाचे आंदोलक   यात सहभागी झाले होते.


मराठा आंदोलकांच्या मागण्या :-

मराठा आणि कुणबी एकच आहेत.त्यामुळे सकल मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे. बॉम्बे गॅझेट,सातारा गॅझेट,हैदराबाद गॅझेटचे पुरावे ग्राह्य धरावे.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावत आहे.सरकारने गांभीर्याने विचार करावा.समाजाच्या मागण्या  तात्काळ मान्य कराव्यात. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे.

मराठा आंदोलकांची पायी रॅली :-

सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्य रस्त्याने पायी रॅली  काढण्यात आली.आंदोलकांनी व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचे आवाहन केले गेले.डोक्यावर भगवी टोपी,गळ्यात रुमाल घालून एक मराठा लाख मराठा,लढेंगे, जितेंगे,हम सब जरंगे,जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणा देण्यात आल्या.शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

आठवडी बाजार असताना व्यापाऱ्यांचे सहकार्य :-

राजुर येथे रविवारी आठवडी बाजार असतो.यादिवशी राजूर बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होत असते. परंतु सकल मराठा समाजाचे वतीने बंद पुकारल्याने व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन आंदोलकास सहकार्य केले.
दरम्यान राजुर येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान