सोमवारी २३ रोजी  पैठण बंदचे आवाहन

सोमवारी २३ रोजी  पैठण बंदचे आवाहन

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके 

 पैठण  : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्या पैठण बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पैठण व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले आणि पैठण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांच्याकडून बंदला प्रतिसाद देण्याचे आश्वासन सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींना देण्यात आले आहे. पैठण येथे सकाळी दहा वाजता ही बैठक संपन्न झाली. बैठकीला तालुक्यातील आणि शहरातील विविध भागातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सोमवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून रॅलीने पाचोड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले जाईल.  बैठकीनंतर सर्व समाज बांधवांनी पैठण पोलीस स्टेशन येथे जावून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शासनाचे आदेश धडकले ; अखेर कोरपणाचे तहसीलदार निलंबित... शासनाचे आदेश धडकले ; अखेर कोरपणाचे तहसीलदार निलंबित...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच नवीन सरपंच निवड साठी घाई करत नवीन सरपंच निवड सभा घेऊन नवीन...
मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !