शासनाचे आदेश धडकले ; अखेर कोरपणाचे तहसीलदार निलंबित...

शासनाचे आदेश धडकले ; अखेर कोरपणाचे तहसीलदार निलंबित...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच नवीन सरपंच निवड साठी घाई करत नवीन सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंचाची निवड करणाऱ्या कोरपण्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना निलंबित करण्यात आले आहे. कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत कढोली (खुर्द) च्या सरपंच सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ. सीता पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले. या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधितांना देण्यात आले होते. तरीही तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीसाठी 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. 

अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्टपर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली. तहसीलदार कोरपना यांनी आर्थिक व्यवहार करून एकतर्फी आदेश काढून घाई घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी अशी मागणी उपसरपंच डॉक्टर विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. याची गंभीर दखल घेत शासनाने चौकशीअंती कोरपनाचे तहसीलदार प्रकाश व्हटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शासनाचे आदेश धडकले ; अखेर कोरपणाचे तहसीलदार निलंबित... शासनाचे आदेश धडकले ; अखेर कोरपणाचे तहसीलदार निलंबित...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच नवीन सरपंच निवड साठी घाई करत नवीन सरपंच निवड सभा घेऊन नवीन...
मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !