सरपंच पत्नीसह पतीला ५० हजाराची लाच घेतांना अटक

सरपंच पत्नीसह पतीला ५० हजाराची लाच घेतांना अटक

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : 'पैसे घेऊन चहा प्यायला या' असा कॉल करून उपसरपंचाकडून विकासनिधीसाठी लाच घेणाऱ्या टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दाम्पत्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) रंगेहाथ पकडले गेले. सरपंच ज्योती आनंद गवळी (२६) व तिचा पती आनंद रमेश गवळी (३२), अशी आरोपींची नावे आहेत. गावाच्या विकासासाठी मंजूर ३ लाखांच्या निधीसाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने मंगळवारी दुपारी ३ वाजता गवळी दाम्पत्याला त्यांच्याच घरातून अटक केली.

४३ वर्षीय तक्रारदार हे ग्रुप ग्रामपंचायत टाकळीमाळी येथे उपसरपंच आहेत. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत हुसेनपूर गावासाठी पंधराव्या वित्त आयोगातून ३ लाखांचा विकासनिधी मंजूर झाला होता. उपसरपंच सातत्याने गवळी दाम्पत्याकडे तो निधी देण्यासाठी मागणी करत होते. आनंदने त्यांना ५० हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे संतप्त उपसरपंचाने त्याची थेट एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली.

घरातच सापळा घरातच अटक गवळीने मंगळवारी उपसरपंचांना पैशांसाठी पुन्हा कॉल केला. 'पैसे घेऊन चहा प्यायला घरीच या' असे सांगितले. ही बाब कळताच निरीक्षक विजयमाला चव्हाण, अंमलदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, चांगदेव बागूल यांनी आरोपीच्या घरासमोर सापळा रचला. तक्रारदार पंचासह घरात गेले. चहा पिऊन झाल्यावर ज्योतीने ५० हजार रुपये स्वीकारताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने आत प्रवेश करत दोघांना अटक केली. ज्योती व आनंद दोघेही बारावी उत्तीर्ण असून, ज्योती गावाची तरुण सरपंच ठरली होती. मात्र, पैशांच्या लालसेपोटी थेट तुरुंगात ठाण्याची वेळ दोघांवर आली. करमाड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड... बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड...
आधुनिक केसरी न्यूज  अकोला : अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील जन्मदात्या नराधम पित्याने व मामाने दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार  केल्याची...
हरडफ येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या 
महागाईविरोधात अनोखे अभियान ; ‘खर्चे पे चर्चा’ 
एका लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर अधिकारी सीबीआय कोठडीत...
श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन
मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी : राहुल गांधी
शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...