शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : आज शिक्षक दिन शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्याला शालेय जीवनात ज्ञान मिळवले. आपल्या जीवनातील पुढील वाटचालीचा पाया शिक्षकच रोवतात.ज्ञानरूपी प्रकाशाने शिक्षकच जीवन उजळवून टाकतात. शिक्षक ज्ञानाचा अथांग सागरच.आद्यगुरु आपले आईवडील आणि बाहेरच्या जगातील गुरु आपले शाळेतील शिक्षक.
कच्च्या मडक्याला घडवण्याचे काम करतात. आम्ही शिक्षक दिनी आणि गुरु पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस, छान टपोरे गुलाबाचे फूल आणून ठेवायचो. आम्ही या दिवशी शिक्षकांना गुलाबाचे फूल देऊन विनम्रतेने नमस्कार करायचो. शिक्षक पण हसतमुखानं फुलांचा स्विकार करायचे व तोंड भरून आशीर्वाद द्यायचे. त्यावेळी सर्वच शिक्षकांकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांचे शिस्तबद्ध बोलणं,चालणं, वागणं यातून न बोलताही सर्वकाही शिकवून जायचे. भाग्यथोर असे शिक्षक मिळाले. वाचनाची आवड निर्माण झाली. आपण आयुष्य जगत असताना कोणाकडून काहीना काही शिकतच असतो. या सर्वांना शिक्षक दिना निमित्ताने आदरपूर्वक वंदन
शिक्षक...
दिन आज शिक्षकाचा
करू मनस्वी सन्मान
त्यांच्या प्रती ठेवू मनी
कृतज्ञता देवू मान
कच्चे मडके विद्यार्थी
देती शिक्षक आकार
घडवती भावी पिढी
खरे राष्ट्राचे आधार
प्रेम जिव्हाळा लावती
आई बनून संस्कार
कण पाजती ज्ञानाचे
आध्यापक शिल्पकार
खडतर मार्ग जरी
अडचणी वर मात
यश मिळावे शिष्याला
असे मदतीचा हात
अखंडीत ज्ञानदान
साक्षरता समाजात
ज्ञानदिप उजळून
ज्ञान किरणे मनात
सौ.किशोरी शंकर पाटील
Comment List