बिनबा गेट परिसरातील बिबट अखेर जेरबंद आमदार किशोर जोरगेवार यांचा 5 तास घटनास्थळी ठिय्या...

बिनबा गेट परिसरातील बिबट अखेर जेरबंद  आमदार किशोर जोरगेवार यांचा  5 तास घटनास्थळी ठिय्या...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेळोवेळी योग्य सूचना दिल्या. जवळपास पाच तास आमदार जोरगेवार घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचा त्यांनी सत्कार केला.

पहाटे पाच वाजताच्या सुमारास बिनबा गेट परिसरातील झाडी-झुडपांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबतच, आमदार किशोर जोरगेवार यांनाही या घटनेची माहिती मिळताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पकडण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.

आमदार किशोर जोरगेवार सुद्धा जवळपास पाच तास घटनास्थळी ठाण मांडून होते. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. इमारतींवर चढून लोकांनी बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे आमदार किशोर जोरगेवार लक्ष ठेवून होते. वेळोवेळी ते जमावाला संबोधित करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. यावेळी आमदार जोरगेवारांनी दूरध्वनीद्वारे पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्याच्या, तसेच काही भाग प्रतिबंधित करण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदार आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही ते सतत संपर्कात होते. नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले. रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी केलेल्या कार्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पथकाचा सत्कार केला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस