महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत आत्महत्या; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण...

महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत आत्महत्या; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण...

आधुनिक केसरी न्यूज 

पुणे : पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाने पुणे शहरातील तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली. अनुष्का सुहास केदार (वय-20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात शिपाई पोलीस म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालयमध्ये नेमणुकीस आहेत. दिघी- वडमुखवाडी या परिसरात राहणाऱ्या अनुष्का यांनी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चाकणकडे जाणाऱ्या पुलावरील गरुड खांबापासून इंद्रायणी नदीत उडी घेतली आहे.

दरम्यान, हे पाहताच तेथे उपस्थित असलेल्या तरुणाने देखील त्यांना वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अनुष्का केदार वाहून गेल्या आहेत, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दल हे अनुष्का यांचा शोध घेत आहेत. अनुष्का यांनी त्यांच्या खासगी जीवनातील वैयक्तिक कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचलल्याची भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस