दोन मुलांच्या आत्महत्ये पाठोपाठ आई - वडीलांचीही आत्महत्या ; संगमनेर येथील दुदैवी घटना
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी :/संगमनेर शहरात वाढेकर गल्लीत राहत असलेले पती पत्नी गणेश वाडेकर व गौरी वाडेकर या दोघांनी ३ सप्टेंबर रोजी सव्वा चार वाजेच्या सुमारास पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूम मध्ये फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी गौरी वाडेकर या समोरच्या दुसऱ्या बेडरूम मध्ये याच पद्धतीने फाशी घेऊन आत्महत्या केली गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेत नौकरी करत होते काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती तर पत्नी गौरी वाडेकर या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पारीचारीका होत्या या घटनेची माहिती होताच पुतण्या प्रशांत वाडेकर यानें संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली त्या नुसार पोलीसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून घटनास्थळी भेट देऊन घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले उशिरा शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले सात दिवसापूर्वी मोठा मुलगा श्रीराज वय २१यांने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर त्याचा लहान भाऊ श्रेयस वय १६याने दिड वर्षापुर्वी पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती घरातील दोन लाडक्या मुलाच्या दुदैवी मृत्यू पाठोपाठ आई वडीलांनी देखील गळफास घेऊन आयुष्याचा अशा पद्धतीने शेवट केल्यामुळे संगमनेर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून असे नेमके या कुटुंबात असे काय घडत गेले की एका पाठोपाठ चार जणांनी इतक्या टोकाचा निर्णय घेऊन आपल्या जीवनाचा शेवट केला संगमनेर पोलिसाच्या तपासाकडे संगमनेर येथील नागरिकाचे लक्ष केंद्रित झाले आहे या मृत्यूचे कारण पुढे आले पाहिजे अशी चर्चा शहरात सुरू होती
Comment List