बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड...
आधुनिक केसरी न्यूज
अकोला : अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील जन्मदात्या नराधम पित्याने व मामाने दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी नराधम पित्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
जन्मदाता पिता व मामाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित दहा वर्षीय चिमुकलीने न्यायालयासमोर बयाण दिले. वडील व मामाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने न्यायालयामध्ये दिलेल्या बयाणात स्पष्ट केले आहे. त्यानंतर अकोटफैल पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपी नराधम पित्याला अटक केली आहे. आरोपी पित्यावर अकोटफैल पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४ (२) (एफ) (एम),६५, (२), ३३३,३५१ (२) (३), तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (एल) (एम) (एन), ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. अकोटफैल पोलिसांनी आरोपीची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अकोटफैल पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
सदर घटनेप्रकरणी आरोपी वडिलास अटक केली आहे. आरोपीची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अतिशय गांभीर्याने करण्यात येत आहे. जन्मदाता पिता व मामाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित दहा वर्षीय चिमुकलीने न्यायालयासमोर बयाण दिले. वडील व मामाने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने न्यायालयामध्ये दिलेल्या बयाणात स्पष्ट केले आहे.
उरळ पोलिस स्टेशन हद्दीतील नराधम शिक्षकाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर अकोटफैल, बार्शिटाकळी व त्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यातील घटना ताज्या असताना अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील जन्मदात्या पिता व मामाने दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याने जिल्हा पूर्णतः हादरून गेला आहे.
Comment List