हरडफ येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज
सिध्दार्थ वाठोरे
हदगाव : तालुक्यातील हरडफ येथील तरुण शेतकरी भास्कर मारोतराव मोरे वय ३५ यांनी दि ४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा च्या सुमारास स्वतः च्या शेतातील लिंबांच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
हदगाव तालुक्यात मागील पाच सहा दिवसापासून सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते हाता तोंडाशी आलेले सोयाबीन कापुस ऊस हे पिक वाहुन गेली त्यामुळे आता आपला संसार कसा चालवायचा मुलांना शिक्षण कसे शिकवायचे बॅंकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे सोयाबीन चे पिक पुराच्या पाण्याचे वाहुन गेले हे पाहून मनात नैराश्य आल्यामुळे हदगाव तालुक्यातील हरडफ येथील तरुण शेतकरी भास्कर मारोतराव मोरे वय वर्षे ३५ यांनी दि चार सप्टेंबर रोजी शेतातील लिंबांच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गावत कळताच एक खळबळ उडाली
गावातील मा. जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील, साईनाथ पाटील, सुनील पाटील शिवाजी जाधव, गोविंद पाथरडकर, गोपीनाथ सुर्यवंशी, पांडुरंग मोरे, बालाजी मोरे, बालाजी सूर्यवंशी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी
मयताच्या गळ्यातील गळफास काढला शेतात पाणीसाचने कुठलेच वाहन शेतात जात नसल्याने चिखलातून मृत्युदेह गावातील तरुणांनी खांद्यावर घेऊन आले होते.
हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात शेवेच्छेदनासाठी आणण्यात आला सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.
Comment List